Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीBihar Hotel Fire : बिहारमधील हॉटेलला भीषण आग! ६ जणांचा मृत्यू तर...

Bihar Hotel Fire : बिहारमधील हॉटेलला भीषण आग! ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

४५ लोकांना वाचवण्यात यश

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar News) येथील जंक्शनच्या अगदी समोर असलेल्या बहुमजली पाल हॉटेलमध्ये (Patna Pal Hotel) आज सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आणि अर्ध्या तासात संपूर्ण इमारत आग आणि धुराने भरून गेली. या आगीत सहा लोकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अग्निशमन दल सध्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.

ही आग इतकी भीषण होती की, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीपर्यंतही आग पोहोचली आणि दोन्ही इमारतींमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. लगतच्या पाटणा किरणालाही आगीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीसमोरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून, स्टेशन रोडही पूर्णपणे ठप्प झाला आहे. या आगीसमोर अग्निशमन दलाची व्यवस्था कमकुवत ठरत आहे.

आग लागल्यानंतर दीड तासानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अर्ध्या तासानंतर दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाटणा सेंट्रल रेंजचे टीएसपी सत्य प्रकाश यांनी या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. त्यात तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सुमारे २० जण जखमी असून त्यांना पाटणा मेडिकल कॉलेजममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेलच्या किचनमध्ये लागलेली आग चार मजली इमारतीत पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. वरच्या मजल्यावर नाश्ता करणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. या घटनेनंतर परिसरात घबराहट पसरली होती. आजूबाजूच्या हॉटेल आणि दुकानातील लोक रस्त्यावर आले. अग्निशमन दल बचाव कार्य आणि लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत ४५ लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर काही लोकांनी इमारतीवरुन उड्या मारुन आपले प्राण वाचवले. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -