Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीपुणे विद्यापीठातील रॅपरवरुन महाविकास आघाडीमध्ये फूट

पुणे विद्यापीठातील रॅपरवरुन महाविकास आघाडीमध्ये फूट

पुणे: पुण्यातील शुभम जाधव रॅपर प्रकरणात महाविकास आघाडीच्याच दोन नेत्यांमध्ये फुट पडल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅपचं शूटिंग झाल्याची तक्रार विदयापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र विद्यापीठातच हे रॅप साँग शुट झाल्याने प्रशासनातील व्यक्तींकडूनच हे रॅप साँग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याचे समोर येत आहे. तसेच त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उबाठा गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील धूसफूस समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी शुभमच्या रॅप साँगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला होता. मात्र आता विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुटींगसाठी मदत मिळाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून हे रॅप साँग शुट करण्यात आलं आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर या प्रकरणात रॅपरला पाठिंबा देत पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता.

मात्र, हे सगळं प्रकरण निंदनीय असल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या रॅप साँग मध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि त्यात वापरण्यात आलेली हत्यारं ही विद्यापीठाच्या परिसरात वापरणं हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते जेव्हा या विद्यापीठाच्या परिसरात येतो तेव्हा सगळ्यांची चौकशी सुरक्षारक्षकांकडून केली जाते आणि कमीत कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो. असं होत असताना जर शुटींग, अश्लील भाषा वापरुन रॅप गाणं तयार केलं जात असेल आणि तलवारी काढल्या जात असतील तर यावर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -