Thursday, May 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजखरा लुटेरा मातोश्रीतच; आमदार नितेश राणे यांनी केली उबाठाची पोलखोल

खरा लुटेरा मातोश्रीतच; आमदार नितेश राणे यांनी केली उबाठाची पोलखोल

कणकवली : खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो. याच मातोश्रीच्या खाली जमिनीत किती खोके आहेत ते टाईल्स उघडुन संजय राऊत यांनी पहावे, असे आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिले. तसेच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे. यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो. आणि राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर कलानगरमध्ये काल बरनॉलचा तुटवडा पडला असणार, अशी जळजळीत टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

उबाठा हा पूर्ण गांधीमय झाला असून काँग्रेस समोर झुकून झुकून गळ्यात पट्टा बांधावा लागला आणि शेवटी जसलोक रुग्णालयात जाऊन ऑपरेशन करून घ्यावे लागले, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

तसेच भाजपा सोबत स्वार्थासाठी गेलो नाही असे म्हणणाऱ्या संजय राऊत याने कलानगर ‘मातोश्री दोन’ला परवानगी कशी मिळाली? याचे उत्तर द्यावे, असे आव्हान नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.

२०१९ मध्ये स्वतःचे १८ खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा चालले. मात्र जेव्हा देशहितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर त्यांना पोटशूळ उठला. राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा नमो पक्ष झाला म्हणणारा मातोश्रीचा नोकर संजय राऊत यांनी आता उबाठा पक्ष सिल्व्हर ओकवादी झाला असे म्हणावे काय? मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम केला असे म्हणायचे काय? असा प्रतिसवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

एक संपादक असलेला माणूस, त्याला पेपरच्या ऑफिसमध्ये शिपाई म्हणून ठेवण्याच्या लायकीचा नाही. अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या कारवाईचे हायकोर्टाने समर्थन केले आहे. त्यामुळे संजय राऊत याने आधी हायकोर्ट स्टेटमेंट वाचावे, असा सल्लाही राणे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -