मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची मुख्य भूमिका असलेला ‘केसरी २’ चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘केसरी २’ चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रजांविरुद्ध लंडनच्या कोर्टात लढलेली कायदेशीर लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
‘केसरी चॅप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ हा ऐतिहासिक कोर्टरूम ड्रामा आहे. करण सिंग त्यागी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. धर्मा प्रॉडक्शन , लिओ मीडिया कलेक्टिव्ह आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन करण सिंग त्यागी आणि अमरितपाल सिंग बिंद्रा यांनी केले आहे. चित्रपटाचे संवाद सुमित सक्सेना यांनी लिहिले आहेत. ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या रघू पलट आणि पुष्पा पलट यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित असलेल्या केसरी २ चित्रपटाचे निर्माते हिरू यश जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्व मेहता, अमरितपाल सिंग बिंद्रा हे आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण देबोजीत रे यांनी केले आहे.
Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती अन् चीनवर मात्र…
‘केसरी २’ चित्रपटात अक्षय कुमार, आर. माधवन, अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नितीन बैद यांनी चित्रपटाचे एडिटिंग केले आहे. शाश्वत सचदेव यांनी या चित्रपटाला संगीताचा साज चढवला आहे. चित्रपटाचे वितरण धर्मा प्रॉडक्शनने केले आहे. हा १३५ मिनिटांचा हिंदी भाषेतील चित्रपट शुक्रवार १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.