Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीWomen Thrashing Each Other : CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद;...

Women Thrashing Each Other : CRPF जवानाची बायको अन् टोल कर्मचाऱ्यामध्ये वाद; एकमेकांच्या झिंज्या पकडून हाणामारी

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यामधील पिंपळगाव टोल (Pimpalgaon Toll Plaza) नाक्यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF Personnel) जवानाची पत्नी आणि टोल नाक्यावरील महिला कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी (Women Thrashing Viral Video) झाली आहे. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला परस्परांसोबत शारीरिक हिंसा करताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, CRPF जवान, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले पुण्याला निघाले होते. बुधवारी, १४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दोन्ही महिला एकमेकांवर आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात.

टोल भरण्यावरुन वाद

ज्या मार्गावरुन सीआरपीएफ जवान पुण्याला निघाला होता तो मार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो. जिथे पिंपळगाव टोल नाका येतो. टोल भरण्यासाठी या नाक्यावर कर्मचाऱ्यांनी या जवानाचे वाहन आडवले. त्यावेळी सदर कर्मचाऱ्याने आपले ओळखपत्र दाखवत टोल भरण्यापासून सवलत मिळावी अशी विनंती केली. मात्र, टोल कर्मचाऱ्यांनी ही विनंती फेटाळून लावली आणि आपण रितसर टोल भरावा अशी मागणी केली. यावेळी टोल कर्मचारी आणि तो जवान यांच्यात वाद निर्माण झाला. जवानाची पत्नी या वादात उतरली असता तिचा आणि टोलवरील महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला. या दोन महिलांमधील वाद वाढत गेला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.

Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

महिलांची हाणामारी, बघ्यांची गर्दी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना हाणामारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातील एक महिला साडीत तर दुसरी महिला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याच्या गणवेशात दिसते आहे. दोन्ही महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. इतक्या की, त्यांनी एकमेकींचे केस पकडून ठेवले आहेत. त्या दोघी एकमेकींना खेचत आहेत.इतकचं नव्हे तर त्यांनी एकमेकींंना कानशिलातही लगावल्याचे पाहायला मिळतंय. भररस्त्यात टोल नाक्यावर झालेला हा वाद उपस्थितांच्या उत्सुकतेचा विषय ठरले. हा प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजुच्या बघणाऱ्यांनी गर्दी केली. त्यातीलच कोणीतरी एकाने हे प्रकरण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केले. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये असेही पाहायला मिळतंय की, काही प्रत्यक्षदर्शी घटनेचे ध्वनिचित्रमुद्रन करण्यात मग्न आहेत. तर काहींनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर काहींनी तत्काळ नाशिक ग्रामिण पोलिसांशी संपर्क साधलाय. याबाबत प्रसारमाध्यमांनी पोलिसांकडे विचारणा केली असता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाने या घटनेत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -