Monday, December 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शिर्डी : कोविड संकट काळात शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात (Sai temple) फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, ती बंदी सुरूच राहिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ही फुल हार बंदी उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश मानले जात आहे.

कोविड काळात सन २०२३ मध्ये साई मंदिरात फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. स्थानिक फुल उत्पादक शेतक-यांनी या बंदी विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच, यासंदर्भात शासन स्तरावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु होता. संस्थानवर कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती. मात्र, निर्णय होत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदिप गोर्डे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

तर साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने १३ एप्रिल २०२३ रोजी ठराव करुन, कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुल विक्री करण्याची परवानगी मिळावी असे म्हणणे न्यायालयात मांडले होते. यापुर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेली होती. फुल उत्पादक शेतकरी तसेच फुल उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या मागणीची सामाजिक दृष्टीकोनातून विचार होण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी सर्वच स्तरांवर आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता.

साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून एक ठराव उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तसेच संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून न्यायालयाने श्री. साईबाबा मंदिर व परिसरामध्ये फुले विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सुनावणी प्रसंगी फुल उत्पादक शेतक-यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ विनायकराव होन, संस्थानच्या वतीने विधीज्ञ बजाज आणि शासनाच्या वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली.

दरम्यान, या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला.शिर्डी शहरात फटाक्यांची अतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले. फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी (Shirdi) विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले.

मंदिर (Shirdi)आणि परिसरात फुल विक्रीबाबत उच्च न्यायालयाने निर्णयाचे आपण स्वागत करीत असून,या निर्णयामुळे तालुक्यातील फुल उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही वर्षात फुल उत्पादक शेतक-याचे झालेल्या आर्थिक नकसानीचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -