Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीप्लास्टिक निर्मुलन कारवाईत ४ लाखांचा दंड

प्लास्टिक निर्मुलन कारवाईत ४ लाखांचा दंड

कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ते ९ जानेवारी दरम्यान प्लास्टिक निर्मुलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, गेल्या ५ दिवसांतील प्लास्टिक निर्मूलन कारवाईत ४,१५,००० इतका दंड संबंधितांकडून आकारण्यात आला आहे.

यामध्ये शुक्रवारी पहाटे ४ वाजल्यापासून सह. आयुक्त सुधीर मोकल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पथक व महापालिका पोलीस यांचे समवेत कल्याण पश्चिम येथील ए.पी.एम.सी. मार्केट, लक्ष्मी मार्केट, महमंद अल्ली चौक परिसरात पाहणी करून १५ किलो प्रतिबंधीत प्लास्टिक पिशव्या जप्त करून संबंधितांकडून रक्कम रुपये ५५ हजार इतका दंड आकारला आणि रस्त्यावर कचरा टाकल्याबाबत ९ व्यक्तींकडून ४,५००/- इतका अधिभार वसूल केला. घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी भाजी मंडईमध्ये फेरफटका मारून तेथील भाजी विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक विरोधात जनजागृती केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -