Monday, August 31, 2026

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान सातव्या थरावर चढलेल्या चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट अचानक तुटला आणि तो थेट खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Badlapur Dahi Handi 2026 Accident)

शिवसेना युवा सेना शहर प्रमुख मितेश धुळे यांच्या आयोजनातून बदलापूरमध्ये ‘माखन चोर दहीकाला उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी माखन चोरहंडी फोडण्यासाठी बदलापूरच्या प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने सात थरांची सलामी दिली. (Badlapur Dahi Handi 2026 Accident)

https://www.prahaar.in/2026/08/31/horrific-accident-in-greater-noida-trailer-crashes-into-car-after-breaking-through-divider-4-dead/

सातव्या थरावर चिमुकला गोविंदा पोहोचल्यानंतर त्याने सलामी दिली. मात्र, त्यानंतर अचानक त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लावण्यात आलेला सेफ्टी बेल्ट तुटला. बेल्ट तुटताच चिमुकला गोविंदा थेट खाली कोसळला. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि गोविंदा पथकातील सदस्यांमध्ये काही काळ घबराट पसरली. चिमुकला खाली कोसळल्यानंतर त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. या घटनेत त्याला नेमकी किती दुखापत झाली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Badlapur Dahi Handi 2026 Accident)

सेफ्टी बेल्ट तुटल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह :

दहीहंडीच्या उंच थरांदरम्यान गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. विशेषतः सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या चिमुकल्या गोविंदांसाठी सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. मात्र, सातव्या थरावर सलामी दिल्यानंतरच सेफ्टी बेल्ट तुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा बेल्ट नेमका कोणत्या कारणामुळे तुटला, त्याची गुणवत्ता किंवा बांधणीमध्ये काही त्रुटी होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आयोजकांकडून या घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. (Badlapur Dahi Handi 2026 Accident)

https://www.prahaar.in/2026/08/31/north-cyprus-ferry-accident-major-news-ferry-carrying-270-passengers-capsizes-over-100-people-rescued-rescue-operations-underway/

दहीहंडीपूर्वी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत :

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. विविध ठिकाणी मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्यांचे आयोजन केले जाते. मात्र, उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांना अनेक थर रचावे लागतात. अशा वेळी गोविंदा जखमी होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. बदलापूरमधील या घटनेमुळे दहीहंडीपूर्वीच लहान गोविंदांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या सुरक्षा साधनांची गुणवत्ता आणि योग्य वापर यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Badlapur Dahi Handi 2026 Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >