Sunday, August 30, 2026

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी फेरी बोट अचानक उलटल्याने एकच खळबळ उडाली. बोट उलटल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. (North Cyprus Ferry Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, ही कॅटामरान-शैलीची फेरी उत्तर सायप्रसमधील किरेनिया बंदरातून तुर्कीतील मेर्सिन प्रांतातील ताशुकू बंदराकडे जात होती. किनाऱ्यापासून सुमारे चार मैल अंतरावर गेल्यानंतर बोटीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच बोट उलटली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. उत्तर सायप्रसच्या आरोग्य मंत्रालयानेही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवले आहे. (North Cyprus Ferry Accident)

https://www.prahaar.in/2026/08/31/mumbai-port-crane-accident-major-accident-while-lifting-cargo-at-mumbai-port-crane-catches-fire-two-operators-injured/

१०० हून अधिक प्रवाशांची सुटका :

उत्तर सायप्रसचे परिवहन मंत्री एर्हान अरिकली यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट उलटल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना किरेनिया येथे आणण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, बोट उलटल्यानंतर तिच्या आसपास समुद्राच्या पाण्यात लाईफ जॅकेट घातलेले प्रवासी तरंगताना दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (North Cyprus Ferry Accident)

https://www.prahaar.in/2026/08/31/8-year-old-anshal-struck-by-speeding-car-dies-before-treatment-female-driver-arrested/

किरेनिया-ताशुकू हा व्यस्त सागरी मार्ग असून या मार्गावर अनेक कंपन्या फेरी सेवा चालवतात. मात्र, दुर्घटनाग्रस्त फेरी नेमकी कोणत्या कंपनीची होती, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (North Cyprus Ferry Accident)

ट्युनिशियातही बोट दुर्घटना :

दरम्यान, दक्षिण ट्युनिशियाच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणारी आणखी एक बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू, तर १२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोट उलटली तेव्हा त्यामध्ये सुमारे १५ जण होते. (North Cyprus Ferry Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >