पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. उत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपक व्यवस्थेतील ‘प्लाझ्मा साऊंड’ तसेच प्रखर लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला आहे. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)
गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडावा, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून आतापासूनच नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाषाण रस्त्यावरील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ध्वनीप्रदूषण, प्रकाशप्रदूषण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)
https://www.prahaar.in/2026/08/30/free-st-travel-good-news-free-st-bus-travel-for-office-goers-heading-home-for-ganeshotsav-find-out-which-routes-the-special-buses-will-run-on/‘प्लाझ्मा साऊंड’ला स्पष्ट नकार :
गणेशोत्सवातील मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. मात्र, यामुळे नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्वनिक्षेपक वापरताना निर्धारित ध्वनीमर्यादेचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. विशेषतः ‘प्लाझ्मा साऊंड’सारख्या मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपक व्यवस्थेचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)
लेझर झोतांवरही पोलिसांची नजर :
ध्वनीप्रदूषणासोबतच यंदा प्रखर लेझर झोतांच्या वापरावरही पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. गणेशोत्सव मंडळांकडून लावण्यात येणाऱ्या प्रखर प्रकाशझोतांमुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या प्रकाशयोजनांबाबतही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)
डेसिबल मर्यादा ओलांडल्यास कारवाई :
गणेशोत्सव मंडळांनी ध्वनिक्षेपकाचा वापर करताना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करावे. डेसिबल मर्यादा ओलांडल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. उत्सव साजरा करताना धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक जबाबदारीही जपणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी बैठकीत स्पष्ट केले. नियमांचे पालन करून उत्सव साजरा केल्यास नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि गणेशोत्सवाचा आनंदही अबाधित राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)
https://www.prahaar.in/2026/08/30/maharashtra-weather-alert-rain-to-take-a-break-by-the-end-of-august-however-heavy-rainfall-expected-in-vidarbha-here-is-the-weather-forecast-for-the-state-including-konkan/कायदा-सुव्यवस्थेसाठी विशेष खबरदारी :
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक रस्त्यावर येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ध्वनी आणि प्रकाशप्रदूषण टाळण्याबरोबरच गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर पुणे ग्रामीण पोलिसांचा भर राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ganeshotsav 2026 Sound Restrictions)






