Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पणासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीतील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवर भाष्य केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगतीशील जिल्हा आहे. शेती, फळबागा या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण आहे. इथला शेतकरी अतिशय मेहनती आहे. आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची वनउपज करणारा आमचा जिल्हा आहे. आज आपण द्राक्षाचा विचार केला, तर देशाच्या द्राक्ष निर्यातीत एकूण 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे कमावलेलं नाव आहे, आमच्या माता-भगिनींच्या डोळ्यात माहित नाही पण नाशिकचा कांदा आमच्या डोळ्यात मात्र वर्षातून दोनदा पाणी आणतो. संपूर्ण देशात नाशिकचा कांदा अतिशय प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं (Lasalgaon) कांद्याचं केंद्र आहे असं म्हणत येथील शेतकऱ्यांचे कौतुक केले.
Nashik : देशभरात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय ...
शेतीचा उत्पादन खर्च उत्पादन खर्च कमी होऊ शकतो
कांद्याला चांगले भाव असल्याने कोणी कांदे घेऊन आला नाही. वर्षातून एकदातरी कांदे भेट मिळतात. आता कांदे भेट मिळाले असते तर घरी नेले असते. भाव पडतात तेव्हा कांदे भेट मिळतात. निश्चित तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शेतमालाचा भाव जेव्हा कमी होतो, तेव्हा होणारं दु:ख, त्याचे परिणाम आम्ही पाहतो. शेती क्षेत्रात तंत्रज्ञान येणं महत्वाचं आहे” असं फडणवीस म्हणाले. आपली लोकसंख्या, परिवार वाढले, आपल्या राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्याची गुंतवणूक क्षमता कमी आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. AI च्या वापर केला तर उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करु शकतो. APP मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.





