मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे अभियांत्रिकी आणि देखभालीची विविध कामे पूर्ण करण्यासाठी रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. विद्याविहार ते ठाणे ५ व्या व ६ व्या मार्गावर आणि ठाणे ते वाशी/नेरुळ अप व डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी ...
ब्लॉकचा तपशील आणि प्रभावित मार्ग:
मेन लाईन: विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यादरम्यान अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
ट्रान्स-हार्बर लाईन: ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या आकारामुळे भविष्यातील पुरांचा धोका ...
मध्य रेल्वे मेगा ब्लॉक: प्रभावित गाड्यांचे क्रमांक आणि वेळा (३० ऑगस्ट २०२६)
डाऊन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या (विद्याविहार - ठाणे दरम्यान वळवण्यात येणाऱ्या गाड्या):
गाडी क्र. 11055 (लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्सप्रेस)
गाडी क्र. 11061 (लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस)
गाडी क्र. 16345 (लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस)
गाडी क्र. 17222 (लोकमान्य टिळक टर्मिनस - काकिनाडा पोर्ट एक्सप्रेस)
(वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी १.३० दरम्यान, नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावतील)
अप मेल आणि एक्स्प्रेस गाड्या (ठाणे/विद्याविहार येथे वळवण्यात येणाऱ्या गाड्या):
गाडी क्र. 22226 (सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस)
गाडी क्र. 11010 (पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस)
गाडी क्र. 12124 (पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस)
गाडी क्र. 12126 (पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस)
गाडी क्र. 12134 (मंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)
गाडी क्र. 13201 (राजगीर - लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस)
गाडी क्र. 17221 (काकिनाडा पोर्ट - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस)
गाडी क्र. 12168 (बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस)
गाडी क्र. 12321 (हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल)
गाडी क्र. 12812 (हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस)
(वेळ: सकाळी ८.०० ते दुपारी १.३० दरम्यान, गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील)
ट्रान्स-हार्बर लाईन लोकल सेवा (ठाणे - वाशी/नेरुळ/पनवेल):
डाऊन सेवा रद्द: सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या गाड्या.
अप सेवा रद्द: सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या गाड्या.
(एकूण ट्रान्स-हार्बर ब्लॉक वेळ: सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० पर्यंत)
पायाभूत सुविधांची सुरक्षितता आणि सुयोग्य देखभालीसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले असून, यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.