Disha Salian death case : १४ व्या मजल्यावरून पडूनही दिशा सालियनच्या अंगावर जखमा कशा नाहीत?

- उच्च न्यायालयाचा सवाल; दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण, निकाल ठेवला राखून


मुंबई : बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान १४ व्या मजल्यावरून पडूनही मृतदेहावर अपेक्षित गंभीर जखमा का दिसत नाहीत, असा कळीचा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणातील सर्व बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. ( Disha Salian death case)


सुनावणीदरम्यान सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद करताना दिशा सालियन हिच्या मृत्यूशी संबंधित पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपासातील तपशील न्यायालयासमोर मांडले. हॉस्पिटलमधील पंचनाम्यात मृतदेहावर कपडे नसल्याचा उल्लेख असल्याचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला असता, हा पंचनामा घटनास्थळावरील नसून हॉस्पिटलमधील असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. तसेच, दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडल्यामुळे कवटीला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.



दिशाचे वडील सतीश सालियन यांचे पोलिसांनी पाच वेळा जबाब नोंदवले असून, जानेवारी २०२४ मधील जबाबात त्यांनी मुलीने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच, राजकीय नेते किंवा सेलिब्रिटींबाबत विचारले असता, ते प्रसिद्ध असल्यामुळे आपण त्यांना ओळखत असलो तरी ते दिशाच्या संपर्कात होते की नाही, याची माहिती नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले होते. दिशाचा प्रियकर रोहन राय याच्या जबाबानुसार, दिशा प्रचंड तणावाखाली होती आणि वडिलांसोबत वाद झाल्यानंतर ती त्याच्याकडे राहण्यासाठी आली होती. दारूचे सेवन केल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. ( Sushant Singh Rajput)

आदित्य ठाकरेंच्या वकिलाचा युक्तिवाद


दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद करताना याचिकेच्या वैधतेवर आक्षेप घेतला. यापूर्वीही याच स्वरूपाची याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र दिशाच्या वडिलांनी त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असे त्यांनी निदर्शनास आणले. ऐकीव माहितीच्या आधारे गंभीर आरोप केले जात असून या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा दावा त्यांनी केला. दिशाच्या कुटुंबीयांबद्दल पूर्ण संवेदना व्यक्त करत, मृत मुलीवरून सुरू असलेले राजकारण आता थांबायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. ( Bombay High Court)

Comments
Add Comment

Chinchpoklicha Chintamani Aganman 2026 : आला आला आला 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आला! उद्या भव्य आगमन सोहळा; काय आहे वेळ, मार्ग अन् गर्दीचे नियोजन ? जाणून घ्या

मुंबई : मुंबईतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani Agaman Sohla 2026) बहुप्रतिक्षित

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा