Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला.


सुनेत्रा पवार यांनी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सुमारे 2.96 एकर परिसरात 34 कोटी 67 लाख 7 हजार 433 रुपये खर्चून हे संकुल उभारण्यात येत आहे. या ठिकाणी खेळाडूंना विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.



क्रीडा संकुलात 28 कार आणि 71 दुचाकींसाठी पार्किंग, वेटिंग हॉल, कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, बॉक्सिंग हॉल, जिम्नॅशियम, झुंबा आणि एरोबिक्स हॉल तसेच महिला आणि पुरुषांसाठी थेरपी एरिया असणार आहे. याशिवाय फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, ज्युडो, रेसलिंग, कराटे, टेबल टेनिस आणि शूटिंग रेंजसारख्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. विविध क्रीडा स्पर्धांसाठी मल्टीपर्पज हॉलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


बारामतीसह पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी संकुलाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या. कामाच्या गुणवत्तेसह सुविधांच्या टिकाऊपणाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या युवा खेळाडू जानवी वीरकर आणि कबड्डी प्रशिक्षक दादासो आव्हाड यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष केंद्राची पाहणी केली. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि केंद्राच्या कामकाजाची माहिती घेत त्यांनी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच ॲग्री मॉल आणि जळोची येथील उपबाजारातील मार्केट कमिटीच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.


Comments
Add Comment

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०