Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या दोरीचा फास लागून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राजर्षी छत्रपती शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून सार्थक योगेश बन्हाटे (Sarthak Yogesh Banhate) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे बन्हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jalgaon News)
पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट राष्ट्रवादी ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्थक बन्हाटे (Sarthak Yogesh Banhate) हा घरात असलेल्या झोपाळ्यावर खेळत होता. खेळताना अचानक दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि दुर्दैवाने तो त्यात अडकला. या दरम्यान, सार्थकची आई घराबाहेर कपडे धुण्याचे काम करत होती. त्यामुळे तिला या घटनेबद्दल कल्पना नव्हती. बाहेरचे काम आटोपून जेव्हा ती घरात आली, तेव्हा सार्थकला झोक्याच्या फासात अडकलेल्या अवस्थेत पाहून तिला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ आक्रोश करत मदतीसाठी कुटुंबातील इतर सदस्यांना हाक मारली. कुटुंबीयांनी तात्काळ सार्थकला फासातून सोडवले आणि त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, फास अत्यंत घट्ट आवळला गेल्यामुळे सार्थकला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. (Jalgaon News)
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथील गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप-लेकाचा ...
कुटुंबीयांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
मृत सार्थक हा त्याच्या कुटुंबात चार वर्षांच्या मोठ्या बहिणीचा लहान भाऊ होता. घरातील लहान आणि सर्वांचा लाडका असलेल्या सार्थकच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या आई-वडिलांना आणि मोठ्या बहिणीला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बन्हाटे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.या हृदयद्रावक घटनेमुळे नशिराबाद परिसरावर सध्या शोककळा पसरली आहे.