Jalgaon : लेकाला वाचवण्यासाठी बाप धावून गेला, पण... पाण्यात बुडून बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथील गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (७) आणि त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Jalgaon News)



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विरु तलवारे हा गुरुवारी सकाळी तलाव परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो तलावाच्या पाण्यात उतरला. मात्र ही गोष्ट काही वेळाने वडिलांच्या निदर्शनास आले. मुलाच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी देखील तत्काळ तलावात धाव घेतली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात अण्णा हे तलावातील गाळात अडकले. तलावात गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना बाहेर निघणे झाले. अन काही वेळातच दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. नागरिकांनी दोघांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र बाप-लेकाला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेनंतर तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (Jalgaon News)



मयत अण्णा तलवारे आणि त्यांचा मुलगा विरु हे मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील मूळ रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा यांची सासुरवाडी असलेल्या खवशी येथे वास्तव्यास होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते येथे राहत होते. मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : पिंपळवंडी पीडित कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा

Local Body Member Appointments : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

- ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी; पंचायत समितीला २० टक्के, तर जिल्हा परिषदेसाठी १० टक्के कोटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :

Mumbai Metro : मेट्रो मार्गिका ७ अ साठी अतिरिक्त उंचीच्या परवानगीची प्रतीक्षा; AAIकडून अंतिम अहवालाची MMRDAला अपेक्षा

मुंबई : मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पातील OHE (Overhead Equipment) यंत्रणेसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीच्या परवानगीचा मुद्दा सध्या

Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय