Sunetra Pawar : पिंपळवंडी पीडित कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट


राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर्थिक मदत;पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय


महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी मोक्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार



पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. दरम्यान घटनेच्या दिवशी पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे तात्काळ आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आर्थिक मदत कुटुंबाला देण्यात आली असून,पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार ‘शबरी आदिवासी घरकुल योजने’अंतर्गत घर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत १० लाख रुपयांची मदत आज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे देखील सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी सांगितले.



पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी पीडित कुटुंबाला विश्वास देत, या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निष्पाप मुलीला न्याय मिळवून देणे आणि पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना न्याय मिळेपर्यंत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. घटना घडलेल्या वस्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने आणि अखंड वीज उपलब्ध राहण्यासाठी सौर हायमास्ट बसविण्यात येतील. तसेच परिसरातील नागरिक, विशेषतः महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या मोक्याच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल,असे आश्वासन सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Jalgaon : हदयद्रावक ! झोका घेताना चिमुकल्याच्या गळ्याला दोरीचा फास लागला अन् क्षणात होण्याचं नव्हतं झालं

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या

Local Body Member Appointments : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

- ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी; पंचायत समितीला २० टक्के, तर जिल्हा परिषदेसाठी १० टक्के कोटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :

Mumbai Metro : मेट्रो मार्गिका ७ अ साठी अतिरिक्त उंचीच्या परवानगीची प्रतीक्षा; AAIकडून अंतिम अहवालाची MMRDAला अपेक्षा

मुंबई : मेट्रो मार्गिका ७ अ प्रकल्पातील OHE (Overhead Equipment) यंत्रणेसाठी आवश्यक अतिरिक्त उंचीच्या परवानगीचा मुद्दा सध्या

Jalgaon : लेकाला वाचवण्यासाठी बाप धावून गेला, पण... पाण्यात बुडून बाप–लेकाचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथील

Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया