Festival Season Sugar Limit : सण-उत्सवांच्या काळात साखरेची झळ! स्विगी, झेप्टो, ब्लिंकिटसह डी-मार्टमध्ये साखर खरेदीवर निर्बंध

मुंबई : येत्या सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपारिक मिठाया बनवण्यासाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, यंदा सण सुरू होण्याआधीच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला खुल्या बाजारात साखरेच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला किरकोळ व्यापाऱ्यांनी आणि मोठ्या सुपरमार्केट्सनी ग्राहकांच्या साखरेच्या खरेदीवर मर्यादा लादल्या आहेत. त्यामुळे जास्त पैसे मोजूनही ग्राहकांना हवी तेवढी साखर खरेदी करता येत नसल्याने यंदाचा सण-उत्सवाचा काळ सर्वसामान्यांच्या बजेटचे गणित पुरते बिघडवणारा ठरणार आहे.



ऑनलाइन ॲप्सवर साखर खरेदीवर निर्बंध


आजकाल मोबाईलवरून सामान मागवणाऱ्या लोकांसाठी एकाच वेळी जास्त साखर खरेदी करणे अवघड झाले आहे. स्विगी, झेप्टो आणि ब्लिंकिटसारख्या ॲप्सने साखरेच्या खरेदीवर मर्यादा घातली आहे . स्विगीच्या एका ऑर्डरमध्ये फक्त २ किलोच साखर घेता येईल. झेप्टोवर एकाच वेळी जास्त पॅकेट खरेदी करता येत नाहीत आणि अनेक ठिकाणी साखरेचा साठा संपल्याचे दिसत आहे. आणि ब्लिंकिटवरही साखरेच्या खरेदीवर मर्यादा लावली आहे.



दुकानांमध्ये आणि सुपरमार्केटमध्येही तीच स्थिती


फक्त ऑनलाइनच नाही, तर प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणाऱ्यांनाही हाच अनुभव येत आहे. 'डी-मार्ट' (DMart) आणि 'रिलायन्स' (Reliance) सारख्या मोठ्या दुकानांमध्ये एका ग्राहकाला एका वेळी २ ते ३ किलोपेक्षा जास्त साखर दिली जात नाहीये.



साखर अचानक महाग का झाली ?


सणांच्या काळात साखरेची मागणी खूप वाढते. बाजारात साखरेची कमतरता भासू नये आणि कोणीही साखरेचा साठा करून काळाबाजार करू नये, यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, सरकारने परदेशातून करमुक्त (Duty-Free) साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. व्यापाऱ्यांना परदेशातून आणलेल्या साखरेवर प्रक्रिया करून ती बाजारात विकण्यासाठी २ महिन्यांचा वेळ वाढवून दिला आहे.



सामान्य माणसांवर काय परिणाम होणार ?


रोजच्या वापरासाठी १-२ किलो साखर लागणाऱ्या कुटुंबांना यामुळे फारसा फरक पडणार नाही. पण सणांसाठी, लग्नसराईसाठी किंवा जास्त प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्यांना मात्र अडचणीचा सामना करावा लागणार आहे. परदेशातून आलेली साखर बाजारात विक्रीसाठी येण्यास थोडा वेळ लागेल, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : ११ हजार किमीच्या सात रेल्वे मार्गांचे लवकरच चौपदरीकरण, मुंबई-हावडा मार्गाचा समावेश

Jalgaon : देशातील अतिवर्दळीच्या रेल्वे मार्गांवरील वाढता प्रवासी आणि मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भारतीय

Jalgaon : सौंदर्य प्रसाधने घेताना जरा जपूनच ! जळगावात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Jalgaon FDA Raid : जळगाव जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर

Jalgaon Crime : भीषण ! रेल्वे मार्गावर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, हत्या की आत्महत्या ? गूढ वाढलं

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे एकाच कुटुंबातील

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची सुट्टी? महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; जाणून घ्या आजचं अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य