Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान एक्स-रे काढला आणि त्यामध्ये जे दिसले ते पाहून तेही आश्चर्यचकित झाले. या मुलीच्या तोंडात तब्बल ८१ दात असल्याचे एक्स-रेमध्ये आढळून आले. हे अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय प्रकरण असून, याला वैद्यकीय भाषेत Hyperdontia असे म्हणतात. (Hyperdontia Case)


या मुलीच्या तोंडात १८ दुधाचे दात, ३२ कायमस्वरूपी दात आणि तब्बल ३१ अतिरिक्त (Supernumerary) दात आढळले. यातील अनेक दात जबड्याच्या हाडांच्या आत अडकले होते, तर काही दातांचा आकारही सामान्य दातांपेक्षा वेगळा होता. (Hyperdontia Case)



दातदुखीमुळे रुग्णालयात गेली अन् समोर आलं धक्कादायक सत्य :


ब्राझीलमधील मिनास गेराइस राज्यातील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ जुईझ डी फोरा येथील डेंटल हॉस्पिटलमध्ये ही मुलगी उपचारासाठी आली होती. जबड्यातील दुधाच्या दातांच्या मुळांचे तुकडे काढण्यासाठी तिच्यावर उपचार केले जाणार होते. मात्र, तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या दातांची रचना काहीशी असामान्य वाटली. त्यामुळे त्यांनी एक्स-रे आणि स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला. स्कॅनमध्ये एकूण ८१ दात असल्याचे स्पष्ट झाले. (Hyperdontia Case)



हे प्रकरण American Journal of Orthodontics and Dentofacial Orthopedics मध्ये २०११ मध्ये प्रकाशित झाले होते. आता सोशल मीडियावर या दुर्मिळ प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Hyperdontia Case)



Hyperdontia म्हणजे काय?


सामान्यतः लहान मुलांना २० दुधाचे दात, तर प्रौढ व्यक्तींना ३२ कायमस्वरूपी दात असतात. या सामान्य संख्येपेक्षा जास्त दात विकसित झाल्यास त्यांना Supernumerary Teeth म्हटले जाते आणि या स्थितीला Hyperdontia म्हणतात. अतिरिक्त दात वरच्या किंवा खालच्या जबड्यात विकसित होऊ शकतात. अनेकदा एक-दोन अतिरिक्त दात आढळतात; मात्र मोठ्या संख्येने अतिरिक्त दात असणे अत्यंत दुर्मिळ आहे. (Hyperdontia Case)


या मुलीमध्ये तब्बल ३१ अतिरिक्त दात आढळल्याने हे प्रकरण विशेष दुर्मिळ मानले जाते. उपलब्ध माहितीनुसार, Hyperdontia ही लोकसंख्येतील तुलनेने दुर्मिळ स्थिती असून तिचे प्रमाण सुमारे ०.१ ते ३ टक्क्यांदरम्यान आढळते. पुरुषांमध्ये ही स्थिती महिलांच्या तुलनेत अधिक प्रमाणात दिसून येते. (Hyperdontia Case)



अनुवंशिक कारणांचा थेट संबंध?


या मुलीमध्ये कोणताही संबंधित सिंड्रोम आढळला नाही. तसेच तिच्या कुटुंबातही अशा प्रकारच्या स्थितीचा इतिहास नव्हता. डॉक्टरांच्या अहवालानुसार, मुलीच्या आईला थॅलिसीमिया होता; मात्र त्याचा मुलीच्या अतिरिक्त दातांशी संबंध असल्याचे आढळले नाही. (Hyperdontia Case)

Comments
Add Comment

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून