आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. यश धनुका अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे. चोरी केल्यानंतर तो गुजरातमधील अहमदाबाद येथे पळून गेला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला अहमदाबादहून परत आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. (Viral Story)
पोलिसांच्या माहितीनुसार, ही चोरी ११ ऑगस्ट रोजी झाली. त्यावेळी कुटुंबातील सदस्य घरी नव्हते. यशने आपल्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या खोलीतील लॉकर फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. ( 50 Lakh Theft Case)
Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू
हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील दुर्गमपुरम स्टेजजवळ भरधाव ...
चोरीनंतर अहमदाबादला पळाला
घटनेनंतर पोलिसांनी सायबर सुरक्षा कक्षाच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीमध्ये कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचा सहभाग असण्याचा संशय पोलिसांना आला. यशचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर तो अहमदाबादमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचे वडील अहमदाबादला गेले आणि त्याला जोरहाटला परत आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. (Viral News)
यशला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
'प्रेयसीवर ५ लाख रुपये खर्च केले'
पोलिसांच्या चौकशीत यशने चोरीच्या कटाबाबत धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले आहे.
त्याने जीतू सोमानी आणि रोहित प्रसाद यांच्यासोबत मिळून चोरीची योजना आखल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, एका डिप्लीकेट चावी बनवणाऱ्याला बोलावून लॉकर उघडण्यात आला.
चोरी केलेल्या पैशांपैकी काही रक्कम त्याने प्रेयसीवर खर्च केल्याचा पोलिसांना संशय आहे. यशने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने तिच्यावर सुमारे ५ लाख रुपये खर्च केले.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, त्याने प्रेयसीला सुमारे दीड लाख रुपयांचा आयफोन भेट दिला. तसेच तिला रोख रक्कम देण्यासोबतच हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तिच्यासोबत काही दिवस घालवल्याचा आरोप आहे.
चोरीची संपूर्ण रक्कम आणि मौल्यवान वस्तूंचा नेमका किती भाग कुठे खर्च झाला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. ( Son Robbed Own House)