Food Poisoning : बापरे! चटपटी चटणी आणि गरमागरम मोमोज खाल्ले अन् 16 जण थेट रुग्णालयात पोहचले

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना अन्नबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून, प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Kurla News)


मिळालेल्या माहितीनुसार, मोमोज खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या, जुलाब, तीव्र पोटदुखी, ताप आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. एकापाठोपाठ अनेकांची प्रकृती बिघडल्याने परिसरात चिंता निर्माण झाली. या घटनेनंतर सर्व बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (Food Poisoning)



यातील 14 जणांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर 2 जणांवर बाह्यरुग्ण विभागात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 14 जणांमध्ये 3 ते 14 वर्षे वयोगटातील काही मुलांचाही समावेश आहे. (Mumbai)


घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश नायर यांनी भाभा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. (Hospital)


सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, या घटनेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि त्यांची गुणवत्ता याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित खाद्यपदार्थामुळेच अन्नबाधा झाली का, याबाबत पुढील तपास आणि आरोग्य विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. (Street Food)


Comments
Add Comment

Kala Ghoda : काळा घोडा परिसराच्या आता दुसऱ्या टप्प्यात होणार सुशोभिकरण

महापलिकेच्यावतीने ९.२३ कोटींची निविदा जारी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या

Raksha Bandhan : दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २ हजारांहून राख्यांची विक्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन

Mumbai Hawkers QR Code ID Card : क्यु आर कोड ओळखपत्रानंतरही फेरीवाले चिंतेत

- रेल्वेस्थानकासह काही भाग मोकळे सोडून व्यवसाय करण्यास मुभा,तरीही कारवाईची टांगती तलवार मुंबई (विशेष

Mumbai Auto-Taxi Fare : रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार! मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार

मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा भार पडणार आहे. 1

Mumbai Metro 7A : MMRDA चा अजब कारभार! २६० कोटींचा मेट्रो पूल आता पाडणार? २.५ मीटरच्या उंचीने काम अडचणीत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Parel Chinchpokli Tension : ईद मिलादच्या मिरवणुकीदरम्यान परळ-चिंचपोकळीत तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त, Video Viral

मुंबई : ईद मिलाद-उन-नबीच्या (Eid Milad) मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ-चिंचपोकळी परिसरात दोन गटांमध्ये वाद