मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांकरिता 'वृक्ष दत्तक योजना' राबवण्यात येणार आहे. यासाठीचा ठराव महापालिका सभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच याची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच प्रशासकीय विभागात वृक्षांच्या देखभालीसाठी वृक्ष तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय याची नियमित पाहणी करण्याची कार्यपध्दती निश्चित केली जाणार आहे. (Tree Adoption Scheme)
- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आता वाढला असून हा पाणीसाठा आता ...
मुंबई महापालिकेत नगरसेविका आशा मराठे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करताना मराठे यांनी “मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखणे, वायू प्रदूषण कमी करणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे. तसेच, नागरिकांना निरोगी व हरित वातावरण उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने मुंबईत सर्व सार्वजनिक वृक्षांची नियमित व शास्त्रोक्त पध्दतीने जोपासना होणे अत्यावश्यक आहे. जोरदार वाऱ्यामुळे तसेच मुसळधार पावसामुळे झाडे पडून जीवित व वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबईत सर्व वृक्षांचे अद्ययावत सर्व्हेक्षण करुन, त्यांची डिजिटल नोंद तयार करुन, सर्व वृक्षांना नियोजित वेळापत्रकानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. (Tree Adoption Scheme)
मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचा तपास ...
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रशासकीय विभागात वृक्षांच्या देखभालीसाठी वृक्ष तज्ज्ञांची नियुक्ती करुन, नियमित पाहणी व अहवाल सादर करावयाची कार्यपध्दती निश्चित करावी. तसेच, नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांकरिता 'वृक्ष दत्तक योजना' प्रभावीपणे राबविण्यात यावी अशाप्रकारची मागणी त्यांनी केली आहे. याबाबतची ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचे धोरण बनवून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Tree Adoption Scheme)