Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काम पूर्ण करूनही थकीत बिलांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या आर्थिक तणावातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Contractor Suicide)


देवकाते यांनी केलेल्या कामाचे बिल प्रलंबित असल्याने ते संबंधित कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र, वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक दबाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Contractor Suicide)



वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र :


थकीत बिलांच्या समस्येबाबत देवकाते यांनी सुमारे वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिल्याची माहिती आहे. काम पूर्ण केल्यानंतरही बिलांची रक्कम वेळेत मिळत नसल्याने कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी या पत्रातून मांडले होते. तसेच, बिल मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात तब्बल १० वेळा चकरा माराव्या लागत असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर प्रलंबित बिलांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Mumbai Contractor Suicide)



महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची पत्रकार परिषद :


दरम्यान, गजानन देवकाते यांनी प्रलंबित बिलांच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक झाला आहे. शासन आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कंत्राटदारांची प्रलंबित बिले, त्यांना होणारा आर्थिक त्रास आणि शासकीय कार्यालयांकडून होणाऱ्या विलंबाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, देवकाते यांच्या टोकाच्या निर्णयामागील नेमकी कारणे आणि संबंधित बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. (Mumbai Contractor Suicide)

Comments
Add Comment

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा