RSS Chief Mohan Bhagwat : मोहन भागवत अमेरिकेत दाखल; न्यूयॉर्कमध्ये ५ हजार जणांच्या मेळाव्याला करणार संबोधन

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दाखल झाले. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क कार्यक्रमाचा हा दौरा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.


न्यूयॉर्कमध्ये आगमन झाल्यानंतर भागवत यांचे टिळा लावून स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ‘विश्वव्यापी एकता’ हा प्रमुख कार्यक्रम असून, शनिवारी प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सुमारे ५ हजार लोकांच्या मेळाव्याला भागवत संबोधित करणार आहेत.



या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ‘अहेड फोरम’ने सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, कार्यक्रमाचा संदेश ‘जग एक कुटुंब आहे’ या विचारावर आधारित आहे. कृत्रिम विभागणी आणि भेदांच्या पलीकडे जाऊन मानवतेला जोडणारे बंध, परस्पर आदर, सलोखा आणि एकतेची भावना स्वीकारण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात येणार असल्याचे फोरमने म्हटले आहे.



न्यूयॉर्कच्या महापौरांचा कार्यक्रमाला विरोध


दरम्यान, न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंगळवारी त्यांनी याबाबत भूमिका मांडली.


मात्र, हा खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाकडे आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही ममदानी यांनी सांगितले.


संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक संपर्क अभियानाअंतर्गत मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनचा दौरा करत असून, या दौऱ्यात ते भारतीय वंशाच्या नागरिकांसह विविध समुदायांशी संवाद साधणार आहेत.

Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या