Kriti Sanon Raksha Bandhan Ad : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या इंडो-वेस्टर्न लूकवरून नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. काही युजर्सनी रक्षाबंधनाच्या जाहिरातीत भावासमोर अशा पोशाखात जाण्यावरून क्रितीला लक्ष्य केले होते. या ट्रोलिंगला क्रितीनेही सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले होते. मात्र, आता या जाहिरातीवरून क्रितीला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान क्रेनवरून ...
क्रितीने ट्रोलर्सना दिलं होतं उत्तर
रक्षाबंधनाच्या जाहिरातीत क्रितीने इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या लूकवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर क्रितीने पोस्ट करत म्हटलं होतं की, सणांचं खरं महत्त्व कपड्यांमध्ये नसून त्या परंपरांशी जोडलेल्या भावना आणि त्यामागील अर्थामध्ये आहे.
मात्र, आता जाहिरात ज्या ‘जिवा’ ब्रँडची होती, त्या ब्रँडनेच ती जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जिवा’ने जाहिरात घेतली मागे
ब्रँडने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण देताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयी आदर असल्याचे म्हटले आहे. अलीकडील जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना अनवधानाने दुखावल्या असतील, तर तसा आपला हेतू नव्हता, असे ब्रँडने स्पष्ट केले.
तसेच, आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून ही जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेत असल्याचे ब्रँडने सांगितले आहे.
त्यामुळे क्रिती सेनन ज्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली होती, तो जाहिरातीचा व्हिडीओ आता ब्रँडने हटवला आहे. जाहिरात मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.






