Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश


मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुट्या खाद्यतेलाबाबत घेतलेल्या कठोर निर्णयामुळे अडचणीत आलेल्या तेल उत्पादक (Loose Edible Oil) आणि लहान विक्रेत्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप केला आहे. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची दखल घेत, ग्राहकांच्या सुरक्षेसोबतच पारंपरिक व्यापारही सुरू राहावा यासाठी एक सर्वसमावेशक आणि लवचिक मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एफडीएला दिले आहेत.



एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने राज्यभर अन्न सुरक्षेची मोहीम तीव्र करत सुट्या किंवा पॅकिंगशिवाय विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधात कठोर पावले उचलली होती. तेलाची गुणवत्ता, योग्य लेबलिंग, साठवणूक आणि भेसळ रोखण्याच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे लहान विक्रेते आणि पारंपरिक तेल व्यापाऱ्यांसमोर संकटाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे याकडे लक्ष वेधले होते.



अन्न सुरक्षेची आणि गुणवत्तेची काळजी घेतानाच छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर अनावश्यक गदा येणार नाही, यादृष्टीने मध्यम मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले. तेलातील भेसळ पूर्णपणे रोखली जावी आणि त्याचवेळी पारंपरिक व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्याची मुभा देणारी 'एसओपी' तातडीने तयार करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे एफडीएच्या या नव्या 'एसओपी'कडे आता व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील