Wednesday, August 26, 2026

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून, राष्ट्रगीताची केवळ पहिली दोन कडवीच गाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा हाच निर्णय आता काँग्रेस शासित कर्नाटक सरकारनेही राज्यात लागू केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी बुधवारी स्पष्ट केले की, वंदे मातरम्ची केवळ पहिली दोन कडवीच गाण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे त्यांचे सरकार पालन करेल आणि ते पक्षाच्या या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत. कर्नाटकातील स्वातंत्र्यदिनाच्या एका कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची सर्व सहा कडवी गाण्यात आल्याची बाब फेटाळून लावत शिवकुमार म्हणाले की, हा प्रकार त्यांच्या नकळत घडला होता आणि सरकार भविष्यात केवळ पहिली दोन कडवी गाण्याच्या भूमिकेवरच कायम राहील. (D. K. Shivakumar)

पूर्ण ‘वंदे मातरम्’ गायनाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, “माझा माझ्या पक्षाच्या विचारसरणीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जो काही निर्णय घेतला आहे, त्यावर मी ठाम आहे. माझ्या नकळत किंवा राजभवनात कदाचित तसे घडले असावे, परंतु भविष्यात आणि कोणत्याही शासकीय कार्यक्रमांमध्ये आम्ही आमच्या आधीच्या निर्णयावर म्हणजेच केवळ दोन कडव्यांवरच ठाम राहू.” (Vande Mataram)

काँग्रेस कार्य समितीने गेल्या आठवड्यात आपल्या १९३७ च्या ऐतिहासिक ठरावाचा पुनरुच्चार केला आहे. या ठरावानुसार, सार्वजनिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम्'ची केवळ पहिली दोन कडवीच गायली जावीत. नवीन ‘वंदे मातरम्’ विधेयकात राष्ट्रीय गीताची सर्व कडवी गाणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आणि या गायनावरून काँग्रेस व भाजपमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. (Vande Mataram)

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत शिवकुमार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, “हा विविध समुदायांचा देश आहे. भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्यावर विश्वास ठेवतो. आमची विचारसरणी याच मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांचा देश असल्याने प्रत्येकाचा आदर केलाच पाहिजे.” (D. K. Shivakumar)

काँग्रेसच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसने राष्ट्रीय गीताचा अपमान केला असून पक्ष केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. मात्र, भाजपने केलेल्या या आरोपांना फेटाळून लावत काँग्रेस पक्षाने आणि डी. के. शिवकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (D. K. Shivakumar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >