नवी दिल्ली : अभिनेत्री कृती सॅनॉनच्या रक्षाबंधन विशेष दागिन्यांच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय पातळीवर पोहोचला आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कृती सॅनॉनच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार बासुरी स्वराज यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. महिलांच्या स्वातंत्र्याबाबत राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, “राहुल गांधी, मी तुमच्या स्त्रीद्वेषावर आवाज उठवत आहे,” असा हल्लाबोल स्वराज यांनी केला. या वादाची सुरुवात दागिन्यांच्या ब्रँड GIVAच्या रक्षाबंधन जाहिरातीपासून झाली. या जाहिरातीत कृती सॅनॉन इंडो-वेस्टर्न पोशाखात दिसत असून ती आपल्या भावाला तसेच पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दाखवण्यात आली आहे. तिच्या पोशाखावर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि पारंपरिक सणाच्या जाहिरातीसाठी हा पोशाख योग्य नसल्याची टीका केली.
मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे १८ वर्षीय तरुणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत २२ महिलांविरोधात मोखाडा ...
या टीकेला कृती सॅनॉनने सोशल मीडियावरून उत्तर दिलं. सणांचं महत्त्व केवळ कपड्यांवर ठरत नाही, तर परंपरा आणि संस्कृतीबद्दलच्या भावनेत असतं, असा मुद्दा तिने मांडला. महिलांनी काय घालावं याबाबत समाजाने सतत सूचना देणं कधी थांबवणार, असा सवालही तिने उपस्थित केला. तिच्या मते, एखाद्या महिलेचा संस्कृतीप्रती असलेला आदर तिच्या कपड्यांवरून ठरवता येत नाही. कृतीच्या या भूमिकेला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. त्यांनी तिची पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत, “स्त्री काय घालते, ती काय करते आणि कुठे जाते—हा तिचा निर्णय आहे. स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्या महिलांना ट्रोल करणं थांबवा,” असं म्हटलं. त्यासोबत त्यांनी #SmashThePatriarchy हा हॅशटॅगही वापरला.
Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया ...
राहुल गांधींच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना बासुरी स्वराज यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या आरोपानुसार, काँग्रेसशी संबंधित काही नेत्यांनी यापूर्वी महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली असताना राहुल गांधींनी त्याचा पुरेसा निषेध केला नाही. कंगना रणौत आणि हेमा मालिनी यांच्याबाबत झालेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचाही त्यांनी उल्लेख केला. स्वराज यांनी पुढे राहुल गांधींना महिला नेतृत्वाबाबत प्रश्न विचारले. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये महिला नेतृत्वाचा अभाव असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणावर टीका केली. तसेच महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणावर भर दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात ...
दरम्यान, या वादाला आणखी धार मिळाली ती अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांच्या प्रतिक्रियेमुळे. कंगनाने कृतीच्या जाहिरातीवर टीका करत, सणाच्या निमित्ताने उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या पोशाखांपैकी असा पोशाख निवडण्याची गरज काय, असा सवाल केला. त्यानंतर राहुल गांधींच्या “Smash the Patriarchy” भूमिकेवरही तिने सोशल मीडियातून टोला लगावला. वाढता वाद लक्षात घेऊन GIVAने ही जाहिरात मागे घेतली आहे. कंपनीने भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आदर असल्याचं सांगत, जाहिरातीमुळे काहींच्या भावना दुखावल्या असतील तर तो आपला हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं. त्यामुळे एका जाहिरातीपासून सुरू झालेला हा वाद आता महिलांचे कपड्यांबाबतचे स्वातंत्र्य, सांस्कृतिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय महिला सक्षमीकरण या मुद्द्यांभोवती फिरताना दिसत आहे. GIVAने जाहिरात मागे घेतली असली तरी राहुल गांधी, बासुरी स्वराज आणि कंगना रणौत यांच्या प्रतिक्रियांमुळे हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





