चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे. या अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे ७५५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याच्या अंगठ्या का खरेदी केल्या जात आहेत आणि त्या नेमक्या कोणाला दिल्या जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
तामिळनाडू सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक पात्र बाळाला 1 ग्रॅम वजनाची २२ कॅरेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. ही योजना १५ सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी आहे. २२ जून किंवा त्यानंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या पात्र बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
सरकारी रुग्णालयात प्रसूतीला प्रोत्साहन :
तामिळनाडू सरकारने ‘थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम’ या योजनेअंतर्गत ही सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांनी प्रसूतीसाठी अधिकाधिक सरकारी रुग्णालयांची निवड करावी, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री के. जी. अरुणराज यांच्या मते, सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रसूती आणि आरोग्यसेवांचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणं हा या योजनेचा उद्देश आहे. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात नुकत्याच झालेल्या ...
४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांसाठी टेंडर :
तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडने (TNMSC) १४ जुलै रोजी ४.४१ लाख १ ग्रॅम वजनाच्या २२ कॅरेट सोन्याच्या अंगठ्यांसाठी निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेत एकूण ११ कंपन्यांनी सहभाग घेतला. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
यामध्ये Joyalukkas India Limited ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली. कंपनीने प्रत्येक अंगठीसाठी मेकिंग चार्ज म्हणून अवघ्या ०.०१ रुपयांची बोली लावल्याचं सांगण्यात आलं आहे. अंगठ्यांमध्ये वापरलं जाणारं सोनं संबंधित वेळी बाजारातील प्रचलित दरानुसार खरेदी केलं जाणार आहे. त्यासाठी खरेदीच्या दिवशी लागू असलेला IBJA AM दर आधार मानला जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
Joyalukkas ला ७० टक्के, Kalyan Jewellers ला ३० टक्के काम :
Joyalukkas – ७० टक्के काम
Kalyan Jewellers – ३० टक्के काम
अशा प्रकारे ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांच्या पुरवठ्याचं काम या दोन्ही कंपन्यांना देण्यात आलं आहे.
सुरुवातीला १.२८ लाख अंगठ्यांचा पुरवठा :
दोन्ही कंपन्यांकडून सुरुवातीच्या चार महिन्यांच्या कालावधीत १,२८,४९९ सोन्याच्या अंगठ्यांचा पुरवठा केला जाणार आहे. संपूर्ण टेंडरमध्ये ४.४१ लाख अंगठ्यांचा पुरवठा करण्याचा समावेश आहे. प्रत्येक अंगठी १ ग्रॅम वजनाची आणि २२ कॅरेट सोन्याची असेल. (Tamil Nadu Gold Ring Scheme)
आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या काही दिवसांवर असून भूलेश्वरच्या ...
‘या’ बाळांना मिळणार सोन्याची अंगठी :
तामिळनाडू सरकारची ही योजना १५ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. २२ जून किंवा त्यानंतर तामिळनाडूमधील सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या पात्र बाळांना या योजनेअंतर्गत १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचं प्रमाण वाढवणं, महिलांना सरकारी आरोग्यसेवा निवडण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढवणं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच, सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर पात्र कुटुंबाला सरकारी आरोग्यसेवेचा लाभ मिळण्यासोबतच या विशेष योजनेअंतर्गत १ ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून मिळणार आहे. (Tamil Nadu Gold Ring Scheme)