आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या काही दिवसांवर असून भूलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बाप्पांच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तसेच असमतल भाग शोधण्यासाठी रस्ते अभियंत्यांनाच रस्त्यावर पिटाळले आहे. या रस्ते अभियंत्यांना प्रत्येक रस्त्यांवर चालत जावून रस्त्याची स्थिती जाणून घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
मुंबईत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन आता प्रत्येक मंडळांच्या मंडपांमध्ये होत आहे. परंतु, या आगमन मार्गावरील खड्डे दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी, लटकणारे केबल्स आदींबाबतच्या उपाययोजना आदींची व्यवस्था केली जात आहे. परंतु भुलेश्वरच्या राजाच्या मूर्तीची दुर्घटना घडल्यानंतर याचा संबंध खड्डयांशी जोडला गेला. परंतु हा रस्ता सिमेंट काँक्रिटीचा असल्याने या मूर्तीची दुर्घटना खड्डयांमुळे झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या आगमनाची लगबग सुरु झाली असून अनेक ...
परंतु, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता श्रींच्या मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मार्गाची विशेष काळजी घेण्यात येणार असून रस्ते अभियंता यांना आता आगमन व विसर्जन मार्गाची पाहणी स्वत: करण्याचे निर्देश दिले आहे. यासाठी सर्व रस्ते अभियंत्यांना रस्त्यावर पिटाळले. यासर्व आगमन आणि विसर्जन मार्गावर स्वत: चालत जावून रस्त्यांची पाहणी करावी. या रस्त्याची पाहणी करताना वाहनाचा वापर करून नये, वाहनातून रस्त्याची पाहणी करू नये अशाप्रकारची सूचना रस्ते अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबईत यंदा रस्त्यांचे सिमेंटीकरण मोठ्याप्रमाणात झाले आहे. तरीही काही रस्त्यांची कामे सुरु आहे, तसेच निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे डांबरी रस्ते कमी प्रमाणात आहे. तरीही बाप्पांच्या आगमन आणि विसर्जन मार्गावर जर रस्त्याचा खराब भाग असेल, खड्डा असेल किंवा असमतल रस्ता असेल तर त्याचा अहवाल प्रत्येक रस्ते अभियंता यांच्याकडून तयार केला जाणार आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत रस्ते अभियंता यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी अहवाल तयार करून त्यानुसार याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे बाप्पांच्या आगमन मार्गावर कोणत्याही प्रकारचे खराब रस्त्याचे विघ्न नसेल याची काळजी घेतली जाईल,असे स्पष्ट होत आहे.