Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थच्या गंभीर आजाराची आणि तो मृत्यूशी झुंज देत असल्याची खोटी बातमी एका युट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आली. ही बातमी स्वतः सिद्धार्थच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संबंधितांना चांगलंच सुनावलं आहे.


विशेष म्हणजे, स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहताना सिद्धार्थला हसू आवरलं नाही. त्याने व्हिडीओमध्ये आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचं स्पष्ट केलं असून, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना ‘सुधरा जरा’ असा टोला लगावला आहे. (Siddharth Jadhav)



‘मी ठणठणीत बरा आहे...’


सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संबंधित युट्यूब चॅनलची बातमी दाखवली आहे. या बातमीत सिद्धार्थ जाधव गंभीर आजाराने त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी पाहून सिद्धार्थ म्हणतो, “कोणाचा वेळ जात नाही... सुधरा जरा, सुधरा जरा.” यानंतर त्याने स्वतःची प्रकृती स्पष्ट करत आपण ठणठणीत असल्याचं सांगितलं. (Siddharth Jadhav)



काळजीने फोन करणाऱ्या चाहत्यांचे मानले आभार :


सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये काळजीपोटी फोन आणि मेसेज करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. त्याने संबंधित बातमीदारांनाही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी एकदा संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्याने उपरोधिक शैलीत खोटी बातमी तयार करणाऱ्याला ‘नॉबेल’ देण्याचा टोमणाही लगावला. तसेच, या खोट्या बातमीमुळे किमान आपल्या नाटकाचं प्रमोशन होत असल्याचंही त्याने मिश्कीलपणे म्हटलं. (Siddharth Jadhav)



‘ॲनिमल’ आणि ‘धिंगाणा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त :


सिद्धार्थने आपण सध्या व्यवस्थित काम करत असल्याचंही सांगितलं आहे. त्याच्या ‘ॲनिमल’ या नाटकाचे प्रयोग सुरू असून, ‘धिंगाणा’च्या शूटिंगमध्येही तो व्यस्त आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं त्याने स्वतः स्पष्ट केलं आहे. (Siddharth Jadhav)



चाहत्यांकडूनही खोट्या बातमीवर संताप :


सिद्धार्थची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी खोटी बातमी पसरवणाऱ्या युट्यूब चॅनलवर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही चाहत्यांनी सिद्धार्थच्या मिश्कील अंदाजाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या काळात सेलिब्रिटींबाबत कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं किती महत्त्वाचं आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. (Siddharth Jadhav)




Comments
Add Comment

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

TV : टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे.

Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका