मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी दृश्यम ३ चित्रपटाची पहिली झलक (First Look) दाखवली आहे. दृश्यम चित्रपटाचे पहिले दोन्ही भाग हिट झाले होते. आता तिसऱ्या भागाची झलक प्रदर्शित झाल्यापासून दृश्यम ३ चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हिंदी दृश्यम ३ चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. रजत कपूर, जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांचाही दृश्यम ३ चित्रपटात समावेश आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची 12 मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे. यासंदर्भात केवळ टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 ...
मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. अभिनेत्री ...
दृश्यम ३ चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अजय देवगणचे रहस्यमय डोळे दिसत आहेत. फोटोवर "माझे खरे, फक्त माझेच कुटुंब आहे" असे नमूद आहे. या पोस्टसोबत अजय देवगणने "प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो... माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वस्व आहे" असे नमूद करत दृश्यम ३ चा फर्स्ट लूक इन्स्टावर पोस्ट केला आहे. निर्मात्यांनी 'दृश्यम ३' चे नाव 'दृश्यम द कन्क्लुजन' ठेवले असून, याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करणार आहेत.
मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका आणि संगीताच्या माध्यमातून मनोरंजन ...
हिंदीत दृश्यम ३ चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच मल्याळममध्ये दृश्यम ४ चित्रपटाची तयारी जोरात सुरू आहे. निर्माते अँटनी पेरुंबावूर यांनी मल्याळम भाषेत दृश्यम ४ येत असल्याचे जाहीर केले आहे. मोहनलालची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तो कुटुंबासाठी कोणालाही मारायला आणि स्वतःचा जीव द्यायला तयार असल्याचे दिसणार आहे. चित्रपटात मोहनलाल जॉर्जकुट्टीची भूमिका साकारणार आहे.