Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लोंला डेंग्यूची लागण; लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मनोरंजनविश्वातील काही अभिनेत्रीही या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर, अविका गौर आणि श्वेता तिवारी यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लोंलाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Poonam Dhillon)


पूनम ढिल्लोंने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिशूल’ या चित्रपटातून केली. त्यानंतर ‘नूरी’ चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पूनमच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी दिली. ‘नूरी’मधील तिच्या अभिनयामुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. (Poonam Dhillon)



यानंतर पूनम ढिल्लोंने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘दर्द’, ‘रेड रोज’, ‘निशान’, ‘रोमांस’, ‘सोहनी महिवाल’, ‘तेरी मेहरबानियां’, ‘समुंदर’, ‘कर्मा’, ‘नाम’, ‘एक चादर मैली सी’ आणि ‘मालामाल’ हे काही उल्लेखनीय चित्रपटांपैकी आहेत. पडद्यावर राजेश खन्ना आणि पूनम ढिल्लों यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘दर्द’, ‘निशान’, ‘जमाना’ आणि ‘आवाम’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले.


चित्रपटांव्यतिरिक्त पूनम ढिल्लोंने टेलिव्हिजन आणि थिएटरमध्येही आपला ठसा उमटवला आहे. २०१३ मध्ये ती ‘एक नई पहचान’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय २००९ मध्ये ‘बिग बॉस ३’मध्येही तिने सहभाग घेतला व त्या पर्वाची उपविजेती झाली. (Poonam Dhillon)


दरम्यान, डेंग्यूची लागण झाल्यानंतर पूनम ढिल्लोंला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, तिच्या प्रकृतीबाबतच्या अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. (Poonam Dhillon)

Comments
Add Comment

Upcoming Reality Shows : सलमान - माधुरीसह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणखी ३ कलाकारांचा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून कमबॅक

मुंबई : १९६५ ते १९७० या काळात जन्मलेल्या ‘झेन एक्स’ पिढीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘मिलेनियल्स’चे चित्रपट, मालिका

Samadhan Sarvankar : 'बेबी सरवणकर'चे आगमन! तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर झाले आई-बाबा

मुंबई : मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन