Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून तरुणीचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा जाब विचारल्याच्या रागातून संबंधित तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात (Nizampur Police Station) १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dhule Crime News)
मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात ...
त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध
रायपूर (Raipur) येथील एका तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र,गावातील एका तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोन करून तरुणीबाबत बदनामीकारक माहिती दिली. त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध आहे असे सांगून ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी संबंधित तरुणाकडे याबाबत जाब विचारला. जाब विचारल्याचा राग आल्याने संबंधित तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी गावातील मारुती मंदिराजवळ फिर्यादीच्या मुलासह त्याच्या पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात कुऱ्हाडीचा वापर करण्यात आल्याने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला, तर त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News)
Nashik News : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. त्यानिमित्ताने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे महादेवांच्या दर्शनासाठी ...
१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये भिवा कृष्णा कारंडे, पोपट भिवा कारंडे, मधू भिवा कारंडे, ,नागो कृष्णा कारंडे, उत्तम नागो कारंडे, पिंटू नागो कारंडे, दशरथ लहानू कारंडे, संदीप उत्तम कारंडे, दिनेश लुका कारंडे, विकास गोरख कारंडे, प्रकाश गोरख कारंडे, समाधान बापू थोरात आणि सुरेश लुका कारंडे यांचा समावेश असून त्यांच्याविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात (Nizampur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






