मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे वडापाव! मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला हा वडा पाव आता जगभरातही प्रसिद्ध आहे. दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी World Vada Pav Day साजरा केला जातो. गरमागरम बटाट्याचा वडा, मऊ पाव, तिखट-गोड चटणी आणि सोबत तळलेली हिरवी मिरची... या साध्या पण भन्नाट कॉम्बिनेशनने वडापावला खवय्यांच्या मनात खास स्थान मिळवून दिलं आहे.
मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग :
साधेपणातच वडापावची खासियत :
कमी किमतीत पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ म्हणून वडापावची लोकप्रियता वाढली. बटाट्याच्या वड्यातील मसाला, लसूण चटणी, हिरवी चटणी आणि पाव यांचा स्वाद वडापावला वेगळीच ओळख देतो. (World Vada Pav Day)
मुंबई : बहिणी-भावाचं नातं हे प्रेम, मस्ती आणि आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेलं असतं. बहिणीला गिफ्ट देण्यासाठी नेहमीच मोठा खर्च करावा लागतो असं नाही. कमी ...
वडापावचेही बदलले रूप :
काळानुसार वडापावमध्येही अनेक प्रयोग झाले आहेत. चीज वडापाव, शेझवान वडापाव, ग्रिल्ड वडापाव यांसारखे अनेक प्रकार आज खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. मात्र पारंपरिक गरमागरम वडापावची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
महाराष्ट्राच्या स्ट्रीट फूडचा मानाचा तुरा :
मुंबईच्या रस्त्यांवरून लोकप्रिय झालेला वडापाव आज महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची जगभर ओळख बनला आहे. त्यामुळे World Vada Pav Day हा या साध्या, चविष्ट आणि सर्वांच्या आवडीच्या पदार्थाचा उत्सव साजरा करण्याचा खास दिवस ठरतो.
मुंबईमधील प्रसिद्ध वडापावची ठिकाणं :
१. दादर – आस्वाद उपहारगृह आणि श्रीकृष्ण - पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीसाठी प्रसिद्ध. २. परेल – दामोदर वडापाव – मुंबईतील जुन्या आणि लोकप्रिय वडापाव ठिकाणांपैकी एक. ३. कीर्ती कॉलेज, दादर – अशोक वडापाव – विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय. ४. कांदिवली – गजानन वडापाव – झणझणीत चटणी आणि गरम वडा यासाठी ओळख. ५. घाटकोपर – भाऊ वडापाव – स्थानिक खवय्यांमध्ये लोकप्रिय. ६. विलेपार्ले – बाबू वडापाव – मुंबईच्या स्ट्रीट फूड संस्कृतीतील लोकप्रिय नाव. (World Vada Pav Day)






