Saturday, August 22, 2026

साप्ताहिक भविष्य, २३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६

समस्या सुटतील

मेष : हा सप्ताह आपणासाठी अतिशय चांगला आहे. कामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करून आपण आपली कार्य सिद्धी करणार आहात..आपल्यातील उत्साहाने आपली कामे सहजतेने व शांततेत होतील. या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये धाडसाचे निर्णय घ्याल. अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडू लागणार आहेत. आपल्या घरामध्ये कौटुंबिक कार्यक्रम होऊ शकतात. आरामदायी वस्तूंवर व थोडा चैनी वर खर्च होणार आहे. खर्चावर आपले लक्ष असू द्यावे. आपल्या आरोग्यावरही लक्ष ठेवणे फार आवश्यक आहे. जेवण खाणे पिणे नियमित ठेवणे जरुरी आहे. महिलांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातून सर्वांचे सहकार्य मिळेल तसेच एखादे मंगल कार्य किंवा धार्मिक कार्य घडू शकते. तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील. नोकरी विषयक कामे होतील. काही सकारात्मक कारणांमुळे जवळचे किंवा दूरचे प्रवास करावे लागतील प्रवास कार्य सिद्ध होतील.

अचानक धनलाभाचे योग

वृषभ : शुभ ग्रहांची भ्रमण आपल्या साठी चांगले आहे. आजूबाजूच्या माणसांना तुमचे महत्त्व कळणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याने व कार्यकुशलतेने आपली दीर्घकाळ रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल समाजातील मान्यवर व सन्माननीय व्यक्तीमुळे आपण आपली कार्ये पूर्ण करू शकाल. मानसन्मान वाढेल. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुम्ही आनंदी असणार आहात. आपल्या कल्पना खूप चांगल्या असल्याने लोक त्याची प्रशंसा करतील व त्या कार्यान्वित होतील. काही अशुभ ग्रहांच्या ग्रहाच्या भ्रमणामुळे व्यावसायिक भागीदारी मध्ये तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. व्यापार-व्यवसायात काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण स्वतः निर्णय घ्यावेत. जास्त धोका पत्करू नका. नात्या संबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.अचानक धनलाभाचे योग घटित होत आहेत.

अपेक्षित उत्पन्न व सत्ता मिळेल

मिथुन : आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने पूर्ण करू शकाल जमीन जुमला स्थावर मालमत्ता याविषयीची कामे मार्गी लागतील. ओळखी मध्यस्ती यशस्वी होतील. आपले विचारही सकारात्मक असणार आहेत. आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न होतील. परदेशातूनही चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे.आपल्यातील कम्युनिकेशन स्किल हे व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यातून आर्थिक लाभाची अपेक्षा पूर्ण होणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहणार आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे.या कालावधीमध्ये आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ह्या कालावधीमध्ये नक्कीच अधिकार मिळतील अपेक्षित उत्पन्न व सत्ता मिळेल. तुमची गती कायम ठेवा. नोकरीतील वातावरण सकारात्मक राहून आर्थिक स्थैर्य मिळेल.

यशाचा आणि समृद्धीचा काळ

कर्क : या सप्ताहात यशाचा आणि समृद्धीचा काळ असणार आहे . आपला कल्पक दृष्टिकोण आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी सुसंवाद रहाणार आहे.आपल्या कार्यकुशलतेने मुळे वरिष्ठ आणि सहकारी यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे. यामुळे आपली प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे परदेशगमनाचे योग..मात्र या कालावधीमध्ये घराकडे फार दुर्लक्ष करू नका. अधिक काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा कुटुंबामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. किंवा काही नुकसान संभवते. आपल्या मौल्यवान वस्तू अथवा महत्त्वाची कागदपत्रे नीट लक्ष देऊन हाताळा. चोरीची अथवा गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक दृष्ट्या सतर्क राहा. तुम्ही व्यावसायिक आणि कौटुंबिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे समतोल राखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडाल. 

नियोजन सफल होईल

सिंह : या सप्ताहामध्ये तुम्ही पूर्ण पणे आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. मुक्त हस्ते खर्च कराल. आपण कोणतेही काम धाडसाने करणार आहात. आपण मोठी झेप घेणार आहात. पूर्वीचे नियोजन सफल होईल. व्यवसाय धंद्यामध्ये काही नवीन करारमदार होतील काही फायद्याचे सौदे हाती येतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. कामामध्ये स्वतःची शिस्त आणि स्वतःचे नियंत्रण हे आपणास फायदेशीर ठरणार आहे औद्योगिक वर्तुळ वाढणार आहे. आपल्या आनंदामध्ये आणि यशामध्ये जोडीदाराचा सहभाग राहणार आहे. ज्या व्यक्ती खेळाडू आहेत त्यांना चांगले यश मिळणार आहे. त्यांचा मन सन्मानात वाढ होणार आहे. प्रसिद्धी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची परिस्थिती निश्चितच सुधारणार आहे. वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.

कौटुंबिक सुखाचा आनंद घ्याल

कन्या : आपण फार आक्रमक होऊ नका.आपल्या हट्टाला नियंत्रण ठेवा तसेच क्रोध आवरा. आपल्या कार्यक्षेत्रात इतर कोणाचाही अपमान करू नका त्याचप्रमाणे कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. वाद-विवाद टाळा. वाद-विवाद होतील अशा प्रसंगां पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा ते हिताचे ठरेल. अन्यथा आपण अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद भांडणे होण्याची शक्यता आहे. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.हा सप्ताह आपणास मिश्र स्वरूपाचा जाणार आहे.फार मोठा धोका पत्करण्याची वृत्ती ला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम काम स्वीकारताना पूर्णपणे विचार करा.जितके जास्त काम कराल तितका जास्त मोबदला मिळणार आहे.आपणास कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे. व्यवसायिक पातळीवर चांगल्याप्रकारे प्रगती होईल. नवीन व्यवसाय होऊ शकतो. नवीन मित्र जोडाल सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा.त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत व्यवस्थित राहणार आहेत. कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल.

प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळेल

तूळ : वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती करणार आहात. आपल्या कारकिर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे.तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत,आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावे यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. आपल्या व्यापार-व्यवसायात कार्यक्षेत्रामध्ये कौशल्याने आणि बारकाईने लक्ष देणे फार आवश्यक आहे, कुठे नुकसान होते का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये आपण चैनीच्या वस्तू किंवा ऐशारामाच्या वस्तू खरेदी करू शकता. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून उलाढाल वाढेल. व्यवसायातील केलेले बदल सकारात्मक सिद्ध होऊन व्यवसायास पोषक ठरतील त्या कामी लागणारे सहकार्य संबंधित व्यक्तींकडून आपल्याला मिळेल व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.

सकारात्मक बदल होणार आहेत

वृश्चिक : स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित चांगले बदल घडणार आहे. हे बदल लाभकारी असणार आहे. थोड्याच प्रयत्नांनी आपल्या समोरील कामे आपण पूर्ण करू शकाल काही महत्त्वाची कामे सहजी झाल्याने आपल्याला आश्चर्य वाटू शकते नशीब आपल्या बरोबर आहे याची खात्री पटेल परमेश्वराचे आभार माना. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. भागीदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे चांगले. त्यामुळे मनःशांती ढळू देऊ नका. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. कुटुंबीयांशी अधिक सलोख्याचे नाते निर्माण होणार आहे. नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे आपण समाधानी असाल.

गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी

धनु : आपला नेहमी दृष्टिकोन सकारात्मक असतो.या सप्ताहातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालणार आहे. आपल्या राशीचा चांगला कालखंड आहे. गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ आहे.मात्र नवीन गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कोणाच्या गोड बोलण्याला अथवा जाहिरातबाजीला फसू नका. आपल्याला जवळच्या सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल.आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन आव्हाने समोर येतील, त्यावर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवणार आहात. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. स्पर्धकांच्या एक पाऊल पुढेच असाल. मात्र तुमच्या सहकार्‍यांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील काही नवीन आव्हाने पुढे उभे राहतील ती स्वीकारा. आपल्या भविष्यासाठी ती फायद्याची ठरतील.

आर्थिक आवक वाढणार आहे

मकर : या सप्ताहात नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे नक्कीच चांगले.नातेसंबंधात वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.आपण सकारात्मक राहिला तर कामाचे आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करताना तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमच्या कल्पना तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता. त्यामुळे आर्थिक आवक वाढणार आहे. काही घटना मनाविरुद्ध घडल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. मात्र अपेक्षा भंगामुळे चुकीचे निर्णय घेऊ नका.कोणतीही लहान-मोठे निर्णय घेताना शांतचित्ताने व पूर्ण विचारांती निर्णय घ्या इतरांचे मार्गदर्शन मिळेल. वाद-विवाद टाळा. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देणे हितकारक ठरू शकते. कुटुंबात ताणतणावाचे प्रसंगयेऊ शकतात. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा त्यामुळे कुटुंबातील शांतता टिकण्या साठी सहाय्य मिळेल.एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे.आपले वागणे प्रभावशाली असणार आहे.त्यामुळे आपण इतरांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास यश मिळवाल. आपली काही इच्छापूर्ती होऊ शकते. आर्थिक लाभ होतील. 

यश येणार आहे

कुंभ : आपण आपल्या नशिबा पेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवणारे आहात. या सप्ताहात आपल्याला नशीबाची साथ कमी मिळणार आहे. आपण आपल्या कार्यात कार्यमग्न राहून प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निराश न होता आपले कार्य चालू ठेवा. उद्योग व्यवसायात भागीदार व्यक्तींकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अती आत्मविश्वास आपल्यासाठी फारसा चांगला नाही. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. आपण या कालावधीमध्ये सकारात्मक असणे फार गरजेचे आहे. सकारात्मक ते मुळे शत्रू अडचणीत येऊ शकतात. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. सरकार व प्रशासन सोबत काम करणार आहात. आपल्या कामांमध्ये आपल्याला यश येणार आहे. काही शुभ ग्रहांच्या भ्रमणा मूळे चांगल्या घटना घडतील.सकारात्मक राहिल्यामुळे आजूबाजूला सकारात्मक घटना घडून त्याचा फायदा आपल्याला होईल.

ताण-तणावापासून मुक्तता मिळेल

मीन : आपल्याला या सप्ताहामध्ये ताण-तणावापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळणार आहे..एखाद्या महत्त्वाच्या कामाची पूर्तता होण्यासाठी आपण चे काही प्रयत्न केले होते त्याचे फळ आता आपल्याला मिळणार आहे ताण-तणावापासून मुक्तता मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे. मात्र या कालावधीमध्ये आपला स्वभाव थोडा आक्रमक बनण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्तरावर तुमची प्रगती होणार आहे. आपणास प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. उद्योग अथवा व्यवसायामध्ये समृद्धी लाभेल. नोकरीत असाल तर नोकरीमध्ये प्रगती होईल. नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळण्याची शक्यता दाट आहे. कामाच्या ठिकाणी मात्र जास्त जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कोणी आपले खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तर त्याकडे सकारात्मकतेने पहाणे गरजेचे ठरेल. परदेशी संबंधातून आपणाला फायदा होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा