Saturday, August 15, 2026

साप्ताहिक भविष्य, १६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, १६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, १६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६

सामाजिक प्रतिष्ठा लाभणार आहे

मेष : नवीन प्रकल्प किंवा मोठी गुंतवणूक टाळणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे व्यवसायात अडचणीत जाणवण्याची शक्यता आहे.नवीन आव्हाने व कामातील नवीन बदल काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे.तुमची वागणूक अतिशय चांगली असणार आहे. अधिकार वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आणि मित्रांसमवेत कुटुंबियांशी चांगले संबंध कसे ठेवावेत याचे तुम्ही धडे घेत आहात. कौटुंबिक पातळीवर आनंद असेल.स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन ओळखी होतील आणि त्या तुमच्यासाठी लाभदायी आणि उपयुक्त ठरणार आहेत सामाजिक प्रतिष्ठा लाभणार आहे दूरचा प्रवास संभवतो. प्रवास कार्य सिद्ध राहतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह विषयक प्रश्न संपुष्टात येऊन विवाह ठरू शकतात. एखादे धार्मिक कार्य घडू शकते.

आत्मविश्वासात वृद्धि

वृषभ : आपण आपल्या बुद्धिकौशल्यद्वारे कठीण समस्या सहजगत्या सोडवाल. आत्मविश्वासात वृद्धि होऊन आपल्या समोरील निर्णय वेगाने घ्याल कौटुंबिक पातळीवरही आणि आपल्या कार्यक्षेत्रात हे आपल्याला यश मिळणार आहे. पोलीस दलातील किंवा डिफेन्स मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना साहसपूर्ण कार्य केल्या बद्दल सन्मान होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांना बसणार आहे त्यांना चांगले यश मिळून, सरकारी नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे.आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहज साध्य यश मिळणार आहे .आपल्या अधिकार पद्धत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वैवाहिक जीवनात चढ उताराची परिस्थिती असू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाचे नियोजन करावे. तरीही ताण येण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रिय असलेले जातक शत्रूंवर अथवा विरोधकांवर विजय प्राप्त करू शकतात. धनलाभाचे योग.

गुंतवणूक फायदेशीर ठरेल

मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात साहस आणि धैर्याने काम केल्यामुळे आपणास प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. व्यापार व्यवसायिकांना बाजारात मंदी असली तरीही आपल्या स्वतःच्या व्यापारामध्ये विशेष फरक पडणार नाही किंवा आपल्याला जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर तज्ञांच्या मदतीने गुंतवणूक केल्यास आपल्यासाठी ते उपयुक्त होणार आहे. विद्यार्थी आपल्या शिक्षणाव्यतिरिक्त एखादी कला जोपासण्याचा प्रयत्न करतील त्यात त्यांना चांगले यश येणार आहे. प्रेमी-प्रेमिका यांनी मात्र सावध पावले उचलावी. वस्तू स्थितीची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त ठरेल विरोध वाढण्याची शक्यता आहे महिलांना स्वतःच्या कामामुळे प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळवून अपेक्षित घटना घडतील काहींना जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. 

चांगले यश प्राप्त होणार आहे

कर्क : आपल्या योजना कार्यान्वित होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. या कालावधीमध्ये आपण आपल्या महत्त्वाकांक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहात. ज्या व्यक्ती रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये काम करत आहे त्यांना चांगल्यापैकी यश मिळणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये कलह होऊ शकतो. त्यामध्ये जास्त वाद-विवाद वाढवू नका. मन शांत ठेवणे फार आवश्यक आहे अन्यथा त्याच्या आपल्या कार्य क्षेत्रावर परिणाम होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यावधी मध्ये आपली एनर्जी लेव्हल खूप चांगली असणार आहे. कामाचा वेग वाढून कामांमध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे. आपल्या मालमत्ते मधील अडकलेले व्यवहार चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. व्यवस्था धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात चांगले यश मिळेल परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते कुटुंबातून तसेच गुरुजना कडून मार्गदर्शन तशीच मदत मिळू शकते प्रयत्न सफल होतील.

महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात

सिंह : हा सप्ताह आपणास संमिश्र घटनांचा आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मार्गात अडचणी आल्या तरी आपण स्वतःचे खच्चीकरण करून घेऊ नका. आत्मविश्वासाने पुढे जाल. आणि सर्व कामे चांगल्या प्रकारे निभावून न्याल. सरकारी कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. आपले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त काम करावे लागणार आहे. त्याच्या मध्ये चांगल्या प्रकारे यश येणार आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करणार आहात. आपल्या सकारात्मक बोलण्याने आपली कामे चांगल्या प्रकारे यशस्वी होणार आहेत. तुम्ही स्वतःशी व स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक असल्यामुळे या कालावधीमध्ये चांगला मोबदला मिळवणार आहात. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या वाढल्यासारखे वाटतील. अधिकार क्षेत्रात वृद्धि होईल. कुटुंबातील मुलांकडून चांगल्या वार्ता कानी आल्यामुळे कुटुंबातील वादावर पण सुखद असेल.

व्यवसायिक जुनी येणी येतील

कन्या : व्यवसायिक क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगले योगदान देणार आहात. नवीन संकल्पना तसेच नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवसायात बदल करण्याची शक्यता. व्यवसायिक जुनी येणी येतील. तुमचे ध्येय निश्चित असणार आहे. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्णपणे होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही. मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अहंकाराचा भाव येण्याची शक्यता आहे. आपली जबाबदारी वाढणार आहे. पण सर्व दृष्टीने सतर्क राहणे फार आवश्यक आहे. या कालावधी मध्ये आर्थिक व्यवहार नीट सांभाळावे. आपल्या स्वभावामध्ये समतोल ठेवा. जेणेकरून आपणास चांगले फायदे मिळतील. या कालावधीमध्ये आपला विकास होणार आपले सहकारी आणि वरिष्ठ यांची सुसंवाद राहणार आहे. अचानक होणारे प्रवास आपल्यासाठी आर्थिक दृष्ट्या फलदायी ठरणार आहेत .सामाजिक कार्यात रस घ्याल.

सलोख्याचे संबंध ठेवाल

तूळ : या काळात तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता ऐशआरामात जीवन जाणार आहात. पण आपण खर्चावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. कौटुंबिक आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. खाजगी, व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. या कालावधीमध्ये नवीन कामातून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे. आपल्या पदामध्ये व स्थानात वृद्धि होईल. आपल्या नवीन योजना कार्यान्वित करण्याचा हा कालावधी आहे. तुमचे व्यक्तीगत आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत, आणि कुटुंब यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवाल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती करणार आहातनोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळवून नोकरीतील वातावरण अनुकूल राहील सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.

कौटुंबिक आयुष्य सुखी असणार आहे

वृश्चिक : या कालावधीमध्ये आपल्याला सर्व बाजूने यश मिळणार आहे. थोड्याच प्रयत्नांती आपल्या व्यावसायिक क्षेत्रात आपण चांगली उंची गाठणार आहात. महत्वाची व दीर्घकाळ रेंगाळलेली कामे गतिमान होऊन मार्गे लावण्यात यश मिळेल. आपणास चांगला मोबदला आणि स्वतःची ओळख तसेच दोन्ही गोष्टी आपणास मिळणार आहेत. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक आयुष्य सुखी असणार आहे. एखादी चांगली संधी चालून येईल स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सुजनशिल क्षमतांचा वापर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे आपल्यासाठी हे बदल लाभकारी सिद्ध होतील. वरिष्ठ वर्गाची आपल्याला कृपादृष्टी लाभणार आहे. या कालावधीमध्ये आपण निश्चितच यशस्वी होणार आहात. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

इच्छा पूर्ण होतील

धनु : हा कालावधी आपणासाठी चांगला असणार आहे. जास्त प्रयत्न न करता आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. घरी किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होणारे नवीन बदल आपल्या पथ्यावर पडतील. आपले जीवनमान बदलेल. तुम्ही यावेळी काही निश्चित निर्णय घ्याल, ते निर्णय आपल्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी राहू शकतात. व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यात समतोल साधणार आहात. काही गोष्टीत खूप कष्टानंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत मिळणार आहे. आर्थिक आवक निश्चित वाढणार आहे. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधान कारक राहील. व्यवसायिक जुनी येणि वसूल होतील. 

पूर्ण सहकार्य मिळेल

मकर : अचानक भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षा भंगामुळे काही चुकीचे निर्णय घेऊ नका. निष्काळजी पणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एखादे अचानक नुकसान होऊ शकते यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. स्वतःकाम स्वतः करा. तुमचं वागणं प्रभावशाली असणार आहे. तुमचे ओळखीच्या व्यक्तींशी संबंध मित्रत्वाचे करण्यात यश मिळणार आहे. एखाद्या व्यवहारात आपणास चांगला आर्थिक फायदा होणार आहे. वाहन खरेदी किंवा मालमत्तेची खरेदी होऊ शकते. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून आपणास पूर्ण सहकार्य मिळेल व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. व्यवसायिक नवीन नवीन संधी मिळून व्यवसाय विस्ताराचे नियोजन करता येईल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील.

संयम बाळगायला हवा

कुंभ : नशिबाचे दान आपल्या विरुद्ध पडत आहे असे आपणास वाटणार आहे. भागी दाराकडून अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास फारसे लाभदायक ठरणार नाही. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.जवळच्या व्यक्तीशी वाद वाढवण्याची शक्यता आहे.आपल्या वरिष्ठ व्यक्तीं बरोबर आपला सुसंवाद राहणार आहे. पुढील वाटचालीमध्ये आपणास त्याचा चांगला फायदा होईल. नवीन कल्पना अमलात आणण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. आपल्या घराकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यात्मिक बाजूकडेल लक्ष दिल्यास तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण होतील. कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करून निर्णय घेणे आर्थिक व्यवहार जपून करणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम बाळगायला हवा.

प्रयत्नांना यश मिळेल

मीन : आपणास काही त्रास आणि खच्चीकरण येऊ शकते. पण या परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थितीकडे सकारात्मकतेने पहाणे आवश्यक आहे. जबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून आपणास पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभणार आहे. नोकरी करत असाल तर बढती योग आहेत. कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल कालावधी आहे. चांगले संबंध आणि चांगला संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळतील. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अध्यात्मिक दृष्ट्या हि तुम्ही वरची पातळी गाठणार आहात. तुम्ही जे काम हाती घेणार आहात त्यात यशस्वी होणार आहात. प्रयत्नांना यश मिळेल. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग घटित होत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा