Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची पाणी पातळी हळू हळू ओसरत आहे पण अनेकांना अद्याप घरी जाणे शक्य झालेले नाही. जे पुन्हा घरी पोहोचले आहेत ते हळू हळू आपली घरे स्वच्छ करून संसार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतीचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणी पूर्ण ओसरल्यानंर शेतजमिनीच्या स्थितीचा नेमका अंदाज येईल.



पूरग्रस्तांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. प्रभावित नागरिक आपली घरे आणि शेती पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची तसेच सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन अभियानाची सविस्तर माहिती दिली.



आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २० ऑगस्टच्या आकडेवारीनुसार आता सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये झाले आहे. राज्यात ३,०८३ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे. सध्या मदत छावण्यांमध्ये २३८ जणांनी आश्रय घेतला आहे. मदत वितरण केंद्रांवर १,१६५ छावणीबाहेरील रहिवाशांना मदत मिळत आहे. प्रभावित भागांमध्ये गुरुवारी राज्य सरकारने ४ वैद्यकीय पथके तैनात केली. सरकारी अधिकारी नुकसानीचे आकलन करण्यात व्यस्त आहेत.
Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड

Kangana Ranaut vs Sharmila Tagore : 'वंदे मातरम' वादावर खासदार कंगना रणौतची शर्मिला टागोर यांच्यावर टीका : "कलेला धर्मात अडकवू नका"

राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि

Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित