Mahadev Betting Scam : महादेव बेटिंग प्रकरणातील सौरभ चंद्राकर मोठे खुलासे करण्यास तयार? भारताकडे मागितले साक्षीदार संरक्षण

Mahadev Betting Scam : महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर याने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती भारतीय तपास यंत्रणांना देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. राजकीय व्यक्ती, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार आणि परदेशातील मालमत्तांशी संबंधित माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. (Saurabh Chandrakar)


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ओमानमधील मस्कत येथील अल खौद नजरबंदी केंद्रात असलेल्या चंद्राकरने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. भारतात परत पाठवण्यापूर्वी आपल्याला साक्षीदार संरक्षणासह आवश्यक सुरक्षा मिळावी, अशी मागणी त्याने ओमानच्या अधिकाऱ्यांकडे केल्याचे समोर आले आहे.  (Mahadev Betting Scam)


चंद्राकरने भारतीय तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचे कथित हितसंबंध असल्याने भारतातील तुरुंगात आपल्या सुरक्षेबाबत चिंता असल्याचे त्याने सांगितल्याचे वृत्त आहे.  (Betting Scam)



चंद्राकरने छत्तीसगडमधील एका वरिष्ठ राजकीय नेत्यासह काही प्रभावशाली व्यक्ती आणि त्यांच्या संबंधित लोकांशी जोडलेल्या परदेशातील मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे. दुबई, संयुक्त अरब अमिरातीतील इतर ठिकाणे, आखाती देश आणि लंडनमधील मालमत्तांचा त्यात समावेश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ त्याने कागदपत्रे, बँक व्यवहार किंवा इतर ठोस पुरावे सादर केले आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Online Scam)


भारताकडे हस्तांतरित करण्यापूर्वी चंद्राकरने स्वतःसह कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच चौकशीदरम्यान न्यायालयीन देखरेख, इलेक्ट्रॉनिक आणि कागदोपत्री पुरावे सुरक्षित ठेवणे आणि सक्षम न्यायालयासमोर जबाब नोंदवण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्याने केल्याचे वृत्त आहे.


इंटरपोलच्या रेड नोटीसच्या आधारे ओमानच्या पोलिसांनी चंद्राकरला ताब्यात घेतल्यानंतर भारतीय यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. भारताने ओमानकडे प्रत्यार्पणाशी संबंधित कागदपत्रे पाठवल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्या भारतातील हस्तांतरणाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. ( Cyber Crime)


दरम्यान, ओमानच्या अधिकाऱ्यांकडून चंद्राकरविरोधातील स्थानिक प्रकरणाचाही तपास सुरू आहे. त्यामुळे भारताकडे त्याचे प्रत्यार्पण कधी आणि कोणत्या प्रक्रियेतून होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. त्याने केलेले राजकीय आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे दावे तपासानंतरच खरे ठरतात का, हे स्पष्ट होणार आहे. ( Saurabh Chandrakar Extradition)

Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी