Eknath Shinde : 'एसटी'च्या ग्रुप बुकिंगसाठी लागणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

- गणेशोत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; लाखो गणेश भक्तांना दिलासा


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. आता संपूर्ण एसटी बस आरक्षित (ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना स्वस्तात एसटी बसने प्रवास करता येईल.


या निर्णयाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.नेते म्हणाले, गणेशोत्सव आणि एसटीचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी हजारो कोकणवासी एसटीने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे ५ हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



कोकणवासीय आणि गणेशोत्सव मंडळांकडून अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतची निवेदनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. कोकणवासीयांच्या मागणीचा विचार करून उप मुख्यमंत्र्यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार यंदा एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंगवर) कोणतेही ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाकडून लवकरच जारी करण्यात येईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


हे शुल्क रद्द करण्यात आल्याने एसटी महामंडळावर येणारा अतिरिक्त आर्थिक भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Nashik Crime : विंचूरमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला बेड्या, कारसह ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime : विंचूर येथील इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत आरोपीला

Nashik Crime : प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात गेली अन्...; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : नाशिकमध्ये आणखी एका नव्या भोंदूबाबाचा नवा प्रताप समोर आला आहे. प्रेमविवाहासाठी भोंदूबाबाच्या दारात

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :