Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा करून सामंजस्याने पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Thane News)


या रस्त्याची रुंदी २० मीटर असून, एकूण ७८० मीटरपैकी सुमारे १८० मीटर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित ६०० मीटर जागेसाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, जागा ताब्यात घेण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. ( DP Road Project)



या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी स्थानिक नागरिकांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावून रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


एमएमआरडीएकडून या रस्त्याच्या कामासाठी मेसर्स गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे काम रखडले आहे. गरज भासल्यास स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन काम सुरळीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


तसेच, रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देशही अण्णा बनसोडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Nashik : छायाचित्रकार दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिकच्या पत्रकार, छायाचित्रकारांसोबत खास क्षण

Nashik : पत्रकारांच्या , छायाचित्रकारांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज अनोखा प्रसंग घडला. आज जागतिक छायाचित्रण

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण

Nashik : पालकमंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचे भव्य स्वागत; विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निर्धार

Nashik : पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील