Nashik Crime News : फिटनेस सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, महिलेची सुटका

Nashik Crime News : फिटनेस सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाक्याजवळील श्रीहरी कुटे मार्गावर एका बंगल्यामध्ये फिटनेस सेंटरच्या (Fitness Center) नावाखाली महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत देहविक्रीच्या या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली असून पोलिसांनी एका पिडीत महिलेची सुटका केली आहे तर दोघा संशयितांविरूद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १५६ कलम ३, ४, ५ अन्वये मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Mumbai Naka Police Station) करण्यात आला आहे.



मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीहरी कुटे मार्गावरील शिवम नावाच्या बंगल्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संजय विजय शर्मा, (रा.अशोकामार्ग, नाशिक) आणि कृष्णाकुमार सिताराम यादव (वय २६, रा. श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक. मुळ गाव अथरा ता. जि.हजारीबाग, झारखंड) यांच्याविरूद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. तर देहविक्रीच्या या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करत पोलिसांनी एका पीडित महिलेची यातून सुटका केली आहे.


उपनिरीक्षक विश्वास चव्हाणके, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेरखान पठाण, हवालदार गणेश वाघ, प्रजित ठाकूर, युवराज कानमहाले, अंमलदार योगेश परदेशी, अतुल पाटील, महिला हवालदार लिला सुकटे, महिला अंमलदार वैशाली घरटे, चालक हवालदार दीपक पाटील आणि विपला या एनजीओ संस्थेचे तुषार सुर्यवंशी, प्रियदर्शनी पवार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.



नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के


दरम्यान, नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहे. दरम्यान बुधवारी सकाळीही ९ वाजता पेठ (Peth) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेठ (Peth) तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसर हा या धक्क्यांनी हादरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याने काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.ग्रामीण आणि आदिवासी भागात वारंवार होणाऱ्या या भूकंपांमुळे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’, आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

Nashik Kumbhmela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद आणि प्रभावी

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या

Thane News : कासारवडवलीतील ७८० मीटर डीपी रस्त्याचा मार्ग मोकळा होणार; अण्णा बनसोडेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा