Nashik Kumbhmela : महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’, आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

Nashik Kumbhmela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद आणि प्रभावी बचावकार्य राबविता यावे, यासाठी आनंदवल्ली घाट येथे तात्पुरत्या जलसुविधांची ‘प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट’ (PoC) चाचणी सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यातील प्रत्यक्ष नदीस्थितीत या सुविधांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनातील उपयुक्तता तपासणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.


१७ ऑगस्टपासून सुरू झालेली ही चाचणी साधारण पुढील २-३ आठवडे सुरू राहणार आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी, प्रवाह आणि परिस्थितीत होणारे बदल लक्षात घेता या कालावधीत तात्पुरत्या जलसुविधांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष वापरातील टिकाऊपणा तपासला जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) या चाचणीदरम्यान नदीपात्राची परिस्थिती, संभाव्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जोखीम तसेच बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचे विशेष मूल्यांकन करीत आहे.



घाटाची पाहणी, विविध चाचणींचा आढावा


नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी सकाळी आनंदवल्ली घाटाची पाहणी करून, सुरू असलेल्या विविध चाचणींचा आढावा घेतला. नदीपात्रात पूरस्थिती, बोट दुर्घटना किंवा अन्य आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने बचावकार्य राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची आणि यंत्रणांची त्यांनी पाहणी केली. या अनुषंगाने १७ व १८ ऑगस्ट रोजी नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या पथकांनी संयुक्त पाहणी केली.


पाहणीदरम्यान नदीपात्रातील संभाव्य धोकादायक ठिकाणे, पाण्याचा प्रवाह आणि बचावकार्याच्या दृष्टीने महत्त्वाचे भाग यांचा अभ्यास करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत बचाव बोटींची हालचाल, सुरक्षित उतरण्याची व चढण्याची ठिकाणे, जेट्टी आणि डॉकिंग सुविधा, तसेच बचाव पथकांसाठी आवश्यक असलेल्या प्रवेशमार्गांचीही पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर जल बॅरिकेडिंग, बचाव बोटी, लाइफ जॅकेट्स, लाइफ रिंग्ज आणि अन्य बचाव साधनसामग्रीची आवश्यकता, त्यांची उपलब्धता आणि योग्य ठिकाणी तैनाती यांचाही आढावा घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथक घटनास्थळी किती वेगाने पोहोचू शकते आणि बचावकार्य सुरक्षितपणे कसे राबविता येईल, याचाही अभ्यास PoCच्या माध्यमातून करण्यात येत आहे.



“पावसाळ्यातील प्रत्यक्ष नदीस्थितीत ही चाचणी घेण्यामागे संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीत बचावकार्य किती प्रभावीपणे राबविता येईल, याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा उद्देश आहे. नदीचा प्रवाह, संभाव्य जोखीम, बचाव बोटींची हालचाल, जेट्टी व डॉकिंगची व्यवस्था, बॅरिकेडिंग आणि आवश्यक सुरक्षा साधनसामग्री यांचे मूल्यांकन या माध्यमातून केले जात आहे. NDRF आणि अन्य संबंधित यंत्रणांकडून मिळणाऱ्या निरीक्षणांच्या आधारे महासिंहस्थाच्या काळात नदीपात्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिक सक्षम आणि समन्वयित प्रतिसाद व्यवस्था उभारता येईल,” असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.


या बहुविभागीय पाहणीमुळे विविध सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नागरी आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाची कार्यपद्धती निश्चित करण्यास मदत होणार आहे. PoCमधून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महासिंहस्थ २०२७साठी नदीपात्रातील बचाव, सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचे पुढील तांत्रिक व कार्यात्मक नियोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nashik : छायाचित्रकार दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नाशिकच्या पत्रकार, छायाचित्रकारांसोबत खास क्षण

Nashik : पत्रकारांच्या , छायाचित्रकारांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज अनोखा प्रसंग घडला. आज जागतिक छायाचित्रण

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण

Nashik : पालकमंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचे भव्य स्वागत; विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निर्धार

Nashik : पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय