Wednesday, August 19, 2026

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

- पद टिकवण्यासाठी पेडणेकरांचा केविलवाणा प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची आता स्वत: चे पद वाचवण्यासाठी अस्तित्वाची लढाई सुरू असून हे पद वाचवण्यासाठी त्यांच्यातच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी झालेल्या महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या निवेदनातच काहीही स्पष्टता नव्हती. त्यांना खुल्या मोकळ्या जागांबाबत निवेदन करायचे होते. परंतु त्यामध्ये शाळा, रुग्णालय तसेच आरोग्य व्यवस्थांचे पीपीपी तत्वावर देण्याबातचाही मुद्दा उपस्थित केल्यामुळे तीन विभाग तथा खात्यांचे मुद्दे एकत्र केल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची गोंधळलेली मनस्थिती पहायला मिळाली.

मुंबई महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी निवेदन करताना प्रशासनाने पीपीपी म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारीच्या नावाखाली मुंबईकरांच्या हक्काच्या मालमत्तांचे जे खासगीकरण सुरु केले आहे, तो थेट मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. मोकळे भूखंड, शाळा, उद्याने, मैदाने आणि हक्काची मार्केट खासगी विकासकांच्या घशात घालून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यकक्षेतील महापालिकेचे मोकळे भूखंड, शाळा, उदयाने आणि मंडई तथा मार्केट खासगी संस्थांना देणारे हे मुंबई विरोधी पीपीपी धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे उद्यान, मैदान आणि मोकळे भूखंड हा विषय उद्यान तसेच विकास नियोजन विभागाशी निगडीत आहे. तर शाळा विषय हा शिक्षण तसेच मंडई हा विषय बाजार विभागाची निगडीत आहे. तिन स्वतंत्र विभाग तसेच त्याला आरोग्य विभागाला जोडण्यात आले. त्यामुळे चार विभागांशी निगडीत हे निवेदन मांडल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची गोंधळलेली मानसिकता स्पष्ट झाली आहे. आदित्य ठाकरे यांना खुश करण्यासाठी खुल्या मोकळ्या जागांचा विषय असताना शाळा, बाजार आणि रुग्णालयांचीही सांगत घालत एकप्रकारे विरोधी पक्षाने स्वत:च्या पक्षाच्या मूळ अजेंड्यालाही हरताळ फासला.

विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनावर बोलतांना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी भूखंडांचे लिलाव, रंगशारदाची आजची स्थिती तसेच बदलेले आरक्षण यासह अनेक विषयांना हात घातला. यावर शिवसेनेचे अमेय घोले यांनी महायुतीची सत्ता सहा महिन्यांपूर्वी आली असून यापूर्वी २५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते? नव्याने एकही धोरण बनवलेले नसून जी काही कार्यपध्दती सुरु आहे ती जुन्याच धोरणानुसार असे सांगत ठक्करची जागा कुणी दिली असा सवाल केला. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी रंगशारदाची जागा ही बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री असताना दिली होती आणि त्यामध्ये तर ८० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला अश्रफ आझमी यांनी केला असेल तर त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. शाळांचे खासगीकरण कुणाच्या मध्यस्थीमुळे झाले आणि कुणाला दिले गेले याचे २०२४मधील आयुक्तांकडील इतिवृत्तांत वाचून दाखवत उबाठाचा पर्दाफाश केला. यावर सभागृहातील गोंधळातच अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी निवेदनावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >