Wednesday, August 19, 2026

Nashik : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवायला गेली अन् मृत्यूने गाठलं ! विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Nashik : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवायला गेली अन् मृत्यूने गाठलं ! विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Nashik News : कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात (Wadivarhe area) गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेला मृत्यूनं गाठलंय. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये (Resort) जेवण केल्यानंतर बाहेर पडत होती मात्र तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली, यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात आहे, की घातपात याबाबत शंका उपस्थित करण्यात येत असून पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय ?

रुपाली नीलेश पाटील (वय ३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) ही महिला नाशिकच्या सिडको (CIDCO) परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये (Diagnostic Center) कार्यरत होती. कंपनीच्या कामानिमित्त ती एका मित्राला भेटण्यासाठी गेली. मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेल्यावर ते जेवण करण्यासाठी रिसॉर्ट थांबले आणि तिथे त्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना मात्र रुपाली पाटील यांच्यावर काळाने घाला घातला. (Nashik Crime News)

गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्...

महिलेचा मित्र गाडी चालवत असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् तो रिसॉर्टच्या गेटला जाऊन धडकला. यामध्ये रुपाली पाटील (Rupali Nilesh Patil) यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा अपघाती मृत्यू झाला की, या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. रात्री उशिरापर्यंत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात (Wadivarhe Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Nashik Crime News)

संशयित ताब्यात, चौकशी सुरू

या घटनेप्रकरणी पोलिसांनी दीपक शिवाजी सैंदाणे (Deepak Shivaji Saindane) (वय ४३) या संशयितास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. कारच्या खाली येऊन रुपाली यांचा अपघाती मृत्यू झाला की, यामध्ये आणखी वेगळं काही षडयंत्र आहे, याचा तपास देखील केला जात आहे. रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे. घटनेचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन ( Dheeraj Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >