Eknath Shinde : 'फार्म टू फॉरेन' मोहिम देणार महाराष्ट्रातील कापड उद्योगाला जागतिक स्थान - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, 'फार्म टू फॉरेन' संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.


जिओ वर्ल्ड सेंटर येथे असोचेम आयोजित 'फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद हर्डीकर यांच्यासह अजय अरोरा, कार्तिकेय धंडा, वृंदा मनोहर देसाई, चिन्मयी देऊळगावकर, उद्योजक, धोरणकर्ते आणि जागतिक तज्ज्ञ उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत @२०४७' च्या स्वप्नाला बळ देण्यासाठी राज्य सरकार ' फाइव एफ' व्हिजनवर काम करत आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. आपल्या शेतातील कापूस, रेशीम, जूट आणि फळांचे जागतिक ब्रँडिंग करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


महाराष्ट्राची 'टेक्सटाईल हब' म्हणून ओळख तसेच मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवून देण्यात कापड गिरण्यांचा मोठा वाटा होता. याच ऐतिहासिक वारशाला पुढे नेत, नागपूरचा पीएम मित्रा पार्क आणि अमरावती टेक्स्टाईल क्लस्टर राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही, तर उत्पादन 'ग्रीन', 'डिजिटल' आणि 'पारदर्शक' असणे गरजेचे आहे. इचलकरंजी, सोलापूर, भिवंडीसह राज्यातील विविध भागांत 'रेडीमेड गारमेंट क्लस्टर्स' उभारले जात आहेत. तसेच, 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना आधुनिक शिलाई प्रशिक्षणाशी जोडून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.


महाराष्ट्राच्या पैठणी, कोल्हापुरी चप्पलयांसारख्या पारंपरिक उत्पादनांच्या जागतिक विस्तारासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे. भायखळा येथील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर 'टेक्स्टाईल, क्राफ्ट अँड कल्चरल म्युझियम' उभारले जात आहे, जे राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख जगाला करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदरामुळे आता राज्यातील उत्पादने काही तासांत जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकतील, असे सांगत त्यांनी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.


कापसापासून बनलेल्या धाग्यांतून आपण केवळ कपडे नाही, तर विकसित भारताचे भविष्य विणत आहोत. लवकरच लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या फॅशन शोरूममध्ये 'मेड इन महाराष्ट्र'चे टॅग दिसेल, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी असोचॅमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


Comments
Add Comment

Water Ambulance : मुंबई महानगर प्रदेशात सुरू होणार 'वॉटर ॲम्ब्युलन्स'

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; संबंधित विभागांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Chandrashekhar Bawankule : सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटपासाठी सुधारित धोरण

- २०१० पासूनची स्थगिती उठणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण

SIR : महाराष्ट्रात 'एसआयआर'च्या वेळापत्रकात बदल

- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रारूप यादी आता ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रातील

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने

Ladki Bahin Yojana : अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींच्या निधी वसुलीबाबत अनास्था?

- माहिती अधिकारातून समोर; ९२ लाख लाभार्थी वगळल्याने वार्षिक खर्च २९ हजार ८१९ कोटींवर मुंबई : राज्य शासनाच्या

Junnar Crime : जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.