SIR : महाराष्ट्रात 'एसआयआर'च्या वेळापत्रकात बदल

- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रारूप यादी आता ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार


मुंबई : महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल केले आहेत. नवीन आदेशानुसार, आता राज्यातील मतदारयाद्यांची प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्धी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी केली जाणार आहे. (SIR)


केंद्रीय निवडणूक आयोगाचे यासंदर्भातील पत्र १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार, पुनरीक्षण मोहिमेच्या टप्प्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर, ३१ ऑगस्ट रोजी मतदारयाद्यांची प्रारूप प्रसिद्धी केली जाईल. (SIR)


प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीतील नोंदींवर दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या काळात नोटीस टप्पा आणि दाखल दावे-हरकतींवर निर्णय व सुनावणीची प्रक्रिया पार पडेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे.


निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व संबंधित यंत्रणांना या बदलाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही या बदलाबाबत लेखी स्वरूपात अवगत करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी आणि प्रशासनाला देण्यात आले आहेत. (SIR)

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'फार्म टू फॉरेन' मोहिम देणार महाराष्ट्रातील कापड उद्योगाला जागतिक स्थान - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने

Ladki Bahin Yojana : अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींच्या निधी वसुलीबाबत अनास्था?

- माहिती अधिकारातून समोर; ९२ लाख लाभार्थी वगळल्याने वार्षिक खर्च २९ हजार ८१९ कोटींवर मुंबई : राज्य शासनाच्या

Junnar Crime : जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 5.5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा काय आहे निकाल...

 Deepali Chavan Suicide : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू

Jalgaon Crime : वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध केल्याने वहिनीची हत्या

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. नियत फिरलेल्या दिराने वहिनीवरच अत्याचाराचा प्रयत्न