Nashik : बंद खोलीत आढळला कुजलेला मृतदेह, मनमाडमध्ये खळबळ

Nashik : नाशिकच्या मनमाड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मनमाड येथील जमधाडे चौकातील रुक्मिणी निवास या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील खोलीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती समोर आली असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


चौकात मटण मार्केटला लागून असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करेसह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. यावेळी पोलिसांना कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. तपासणी केली असता पोलिसांना मृतदेहाच्या खिशात काही कागदपत्रे सापडले. यामध्ये आधार आणि पॅनकार्डवर त्याचे नाव अजय हिरामण पवार (५०, रा. एमजीआय कोकण वसाहत, कल्याण) असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा उलगडा होईल. (Nashik Crime News)



अजयचा घटस्फोट झाल्यानंतर तो मनमाडला आला होता आणि येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचा मृत्यू किमान तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Shiv Sena UBT : उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य

SIR : महाराष्ट्रात 'एसआयआर'च्या वेळापत्रकात बदल

- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय; प्रारूप यादी आता ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रातील

Nashik Kumbhmela : महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’, आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

Nashik Kumbhmela : महासिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद आणि प्रभावी

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम