Aadhaar Biometric Update : देशातील दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्ण

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) तर्फे देशभरात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेल्या अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन (एमबीयू) मोहिमेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून देशभरातील शालेय विद्यार्थ्यांपैकी 20 दशलक्षांहून अधिक (2 कोटींहून अधिक) विद्यार्थ्यांची अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतने पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या एमबीयू स्थितीबाबत दृश्यमानता देऊ करणाऱ्या शिक्षणासाठीच्या एकीकृत जिल्हा माहिती यंत्रणा प्लस (यूडीआयएसई+) सह यूआयडीएआयचे तांत्रिक एकत्रीकरण करून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.


सप्टेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात आलेल्या विशेष अभियानाचा विस्तार आतापर्यंत 1.56 लाख शाळांपर्यंत झाला असून या अभियानाच्या मदतीने, समर्पित शाळा-स्तरीय शिबिरे तसेच यूआयडीएआय आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांतर्फे राबवण्यात येणारे समन्वित संपर्क कार्यक्रम यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण करणे सोयीस्कररित्या शक्य झाले आहे. या उपक्रमामुळे एमबीयूसंबंधी सेवा विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत उपलब्ध होण्यात मदत झाली असून सदर प्रक्रिया कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभतेने आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध झाली आहे.


पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीच्या आधार नोंदणीद्वारे लोकसंख्याविषयक माहिती आणि छायाचित्र जमा केले जाते तर या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे बायोमेट्रिक्स अजूनही विकास पावत असल्यामुळे या मुलांच्या दोन्ही बायोमेट्रिक घटकांची नोंद केली जात नाही. लहान मुलांच्या आधारमध्ये अद्ययावत बायोमेट्रिक माहिती जमा केली जाईल याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी एमबीयु सहाय्यक ठरते. बालकाच्या वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि पुन्हा त्याच्या वयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा दोन टप्प्यांवर एमबीयु आवशयक असते. एमबीयुची योग्य वेळी पूर्तता झाल्यामुळे विद्यार्थ्याला शाळा आणि उच्च शिक्षणाचे टप्पे पार करत आधार प्रमाणीकरण अनिवार्य असलेल्या विविध सेवा आणि लाभ मिळवताना आवश्यक असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याची सुनिश्चिती होण्यात मदत होते.


सदर प्रक्रियेची वेळेवर पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आणि संबंधित सेवा आधील सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युआयडीएआयने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना एमबीयूसाठी भरावे लागणारे शुल्क 1 ऑक्टोबर 2025 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द केले होते. वय वर्षे 5 ते 7 आणि 15 ते 17 या गटांतील मुलांसाठी पूर्वीप्रमाणेच यापुढेही एमबीयू सेवा निःशुल्क असणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 30 सप्टेंबर 2026 पर्यंत 5 ते 17 वर्षे या वयोगटासाठी एमबीयू मोफत असणार आहे.


आधारचे एमबीयू करून घेतले नाही तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना, नीट, जेईई, सीईआयटी इत्यादींसारख्या अनेक स्पर्धा तसेच विद्यापीठ परीक्षांसाठी नावनोंदणी करताना आवश्यक असलेल्या प्रमाणीकरणाच्या वेळी अडचणी उद्भवू शकतात. पालकांनी तसेच कायदेशीर संरक्षकांनी त्यांच्या मुलांसाठी आधारमध्ये एमबीयूची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे.

Comments
Add Comment

Delhi CJP Protest : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनात होते माओवादी, जनसंघर्ष समितीचा आरोप

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

Supreme Court : गळफास पद्धतीने दिली जाणारी फाशीची शिक्षा रद्द होणार नाही, पण... सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले ?

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी गळफास देण्याची (फाशीची) सध्याची पद्धत रद्द करण्याची

Cockroach Janata Party : सीजेपी आंदोलकांवर 'जास्तीत जास्त संयम आणि किमान बळाचा' वापर

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha