ChatGPT : किशोरांसाठी आलं अधिक सुरक्षित चॅट जीपीटी

मुंबई : १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करता यावा, यासाठी ‘ओपनएआय’ने ‘चॅटजीपीटी’ची नवी सुविधा जाहीर केली आहे. अभ्यास, आकलन, चिकित्सक विचार आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतानाच किशोरांच्या सुरक्षिततेसाठी या सुविधेत अधिक सक्षम संरक्षण व्यवस्था करण्यात आली आहे. वापरकर्ता १३ ते १७ वर्षे वयोगटातील असल्याचे सांगतो किंवा प्रणालीला तो १८ वर्षांखालील असल्याचे आढळते, अशा वेळी त्याला किशोरांसाठीच्या ‘चॅटजीपीटी’ सुविधेत समाविष्ट केले जाणार आहे.


या सुविधेत अभ्यास पद्धती, गृहपाठासाठी मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा, अभ्यासाचे दृश्य स्वरूप आणि वापरासाठी ठरावीक वेळ निश्चित करण्यासारखे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभ्यास करताना थेट उत्तरे देण्याऐवजी मार्गदर्शक प्रश्न आणि टप्प्याटप्प्याने मदत करून विषय समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. गृहपाठाच्या वेळीही तयार उत्तरे देण्याऐवजी समस्या स्वतः सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. आत्महानी, हिंसा, खाण्याशी संबंधित विकार, धोकादायक कृती तसेच लैंगिकदृष्ट्या स्पष्ट मजकूर अशा जोखमीच्या विषयांवर अधिक कडक संरक्षण देण्यात आले आहे. दीर्घकाळ वापर केल्यानंतर किशोरांना विश्रांती घेण्याची आठवण करून देणाऱ्या सूचनाही दिल्या जाणार आहेत. किशोरांच्या ‘चॅटजीपीटी’ खात्यांशी जोडलेल्या पालकांना वापराशी संबंधित काही पर्याय व्यवस्थापित करण्याची सुविधा मिळणार आहे. विशिष्ट वेळेत वापरावर मर्यादा घालण्यासाठी ‘शांतता कालावधी’ निश्चित करता येणार असून, गंभीर जोखमीच्या परिस्थितीत पालकांना सुरक्षिततेशी संबंधित सूचना मिळण्याची सुविधाही देण्यात आली आहे.


‘ओपनएआय’च्या भारतातील धोरण व जागतिक व्यवहार विभागाच्या प्रमुख प्रज्ञा मिश्रा यांनी किशोरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधी आणि सुरक्षितता यापैकी एकाची निवड करण्याची गरज नसल्याचे सांगितले. पालक आणि शिक्षकांनी किशोरांच्या वापरात सहभागी राहून त्यांना प्रश्न विचारण्यास, चिकित्सक विचार करण्यास आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत योग्य मर्यादा निश्चित करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबईत आयोजित ‘किशोरांची सुरक्षितता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संवाद कार्यक्रमात अभिनेत्री व लेखिका सोहा अली खान आणि तिस्का चोप्रा यांनी पालक म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आपले अनुभव मांडले. सोहा अली खान यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना स्वतंत्र विचार आणि निर्णयक्षमता कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली, तर तिस्का चोप्रा यांनी पालकांनी योग्य प्रश्न विचारण्यासाठी जागरूक राहणे आणि किशोरांच्या तंत्रज्ञान वापरात अर्थपूर्ण सहभाग ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. किशोरांसाठीची नवी सुविधा, पालकांसाठीची मार्गदर्शिका आणि कुटुंबे व शिक्षकांसोबतचे उपक्रम यांच्या माध्यमातून १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित, जबाबदार आणि वयाला अनुरूप वापर करता यावा, यावर ‘ओपनएआय’ने भर दिला आहे.


पालकांसाठी माहितीपुस्तकही प्रकाशित : ‘ओपनएआय’कडून ‘चॅटजीपीटीसह शिक्षणासाठी पालकांची मार्गदर्शिका’ हे माहितीपुस्तकही प्रकाशित करण्यात आले. या मार्गदर्शिकेत पालकांना किशोरांसाठीच्या ‘चॅटजीपीटी’च्या सुविधा समजून घेणे, पालक नियंत्रणाचा वापर करणे, मुलांच्या शिक्षणाला योग्य दिशा देणे आणि घरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आरोग्यदायी सवयी विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Aadhaar Biometric Update : देशातील दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्ण

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) तर्फे देशभरात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेल्या

Delhi CJP Protest : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनात होते माओवादी, जनसंघर्ष समितीचा आरोप

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

Supreme Court : गळफास पद्धतीने दिली जाणारी फाशीची शिक्षा रद्द होणार नाही, पण... सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले ?

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी गळफास देण्याची (फाशीची) सध्याची पद्धत रद्द करण्याची

Cockroach Janata Party : सीजेपी आंदोलकांवर 'जास्तीत जास्त संयम आणि किमान बळाचा' वापर

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या